जळगाव जिल्हा

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; जळगाव शहरातून जयश्री महाजनांना संधी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२४ । विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाकडून १५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात जळगाव शहरातून जयश्री महाजन यांना संधी देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्यातील जागांवर महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आले होते. यात जळगाव शहरातून महायुतीने आमदार राजूमामा भोळे यांना उमेदवारी जाहीर केलीय.मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीकडून जळगाव शहरातील जागेवर उमेदवार जाहीर झाला नव्हता. यामुळे कोणाला उमेदवारी मिळेल याची उत्सुकता लागली होती.

अखेर आज शिवसेना ठाकरे गटाची यादी जाहीर झाली आहे. यात 15 उमेदवारांच्या नावची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत जळगावमधून जयश्री महाजन यांना संधी देण्यात आली आहे.त्यामुळे आता विद्यमान आमदार राजूमामा भोळे आणि जयश्री महाजन यांच्यात टक्कर होणार आहे. तर चोपडामधून राजू तडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर
एकूण 15 उमेदवारांचा शिवसेना ठाकरे गटाच्या दुसरे यादी समावेश

१) धुळे शहर- अनिल गोटे
२)चोपडा (अज)- राजू तडवी
३) जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन
४) बुलढाणा- जयश्री शेळके
५) दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल
६) हिंगोली- रूपाली राजेश पाटील
७) परतूर- आसाराम बोराडे
८) देवळाली (अजा) योगेश घोलप
९)कल्याण पश्चिम- सचिन बासरे
१० )कल्याण पूर्व – धनंजय बोडारे
११) वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव
१२ )शिवडी- अजय चौधरी
१३) भायखळा- मनोज जामसुतकर
१४)श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे
१५)कणकवली- संदेश भास्कर पारकर

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button