जळगाव जिल्हामहाराष्ट्रराजकारण

जयंत पाटलांचा चिमटा.. गुलाबराव पाटील कासव तर चिमणआबा ससा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२२ । सत्ता संघर्ष वेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत चिमणराव पाटील हे आधी गेले होते. मात्र त्यांच्यानंतर शिंदे गटात गेलेल्या गुलाबराव पाटील यांना मंत्रिपद मिळालं तर चिमणराव पाटलांना ते मिळालं नाही यामुळे गुलाबराव पाटील कासव ठरले तर चिमणराव पाटील (Chinmanrao Patil) हे ससा ठरले असा टोमणा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत चिमणराव पाटील यांना लगावला. (Jayant Patil On Chinmanrao Patil And Gulabrao Patil)

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे. अधिवेशनावेळी भाषण करताना राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी चांगलीच फटकेबाजी केली. यावेळी शिंदें सोबत जाऊनही ज्या आमदारांना मंत्रिपद मिळाले नाही किंबहुना महाविकास आघाडीमध्ये असताना मिळालेल्या मंत्रिपदापेक्षा खालच्या दर्जाचे मंत्रीपद मिळाले अशा सर्व आमदारांना जयंत पाटील यांनी चिमटे काढले.

यातच सर्वात मोठा चिमटा त्यांनी काढला तो म्हणजे पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांना. चिमणराव पाटील चार टर्म आमदार आहेत. ते एकनाथराव शिंदे यांच्यासोबत पहिल्याच गाडीतून गेले होते. मात्र त्यांच्या मागून आलेल्या गुलाबराव पाटील यांना मंत्रीपद मिळालं. अशावेळी मला ससा आणि कासवाची गोष्ट आठवते असा चिमटा जयंत पाटील यांनी चिमणराव पाटील यांना काढला. गुलाबराव पाटील यांना मंत्रीपद देल चिमणराव पाटील यांना देखील मंत्रिपद देणं गरजेचं होतं म्हणजे दोघेही मंत्रीपद झाले असते आणि चिमणरावांना न्याय मिळाला असता असा चिमटा यावेळी जयंत पाटील यांनी काढला.

Related Articles

Back to top button