⁠ 
सोमवार, जून 17, 2024

आधी लग्नाचे आमिष देऊन शारीरिक संबंध ठेवले, नंतर महिलेसोबत घडलं भयंकर ; जळगावातील घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२४ । जळगावातून महिलेवर झालेल्या अत्याचाराची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाचे आमिष देऊन महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. नंतर लग्नाला नकार दिला तरीही महिलेचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत संशयित नराधम भुमेश बापू निंबाळकर याच्याविरुद्ध शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमकी घटना?
जळगाव शहरातील एका भागात वास्तव्यास असलेली ३२ वर्षीय महिलेची अयोध्या नगरातील भुमेश बापू निंबाळकर या तरुणासोबत ओळख निर्माण झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम संबंधातून लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. याचे त्याने व्हिडीओ देखील करून ठेवला होता. त्यानंतर भुमेशने महिलेला लग्नास नकार दिला. त्यामुळे महिलेने त्याच्या सोबत संबंध तोडले होते. असे असतांना भुमेशने महिलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आणि मारहाण करून बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केले.

ही घटना २१ मे २०२१ ते २५ मे २०२४ दरम्यानच्या काळात घडली. हा प्रकार सहन न झाल्याने पिडीत महिलेने अखेर शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अखेर गुरूवारी ६ जून रोजी दुपारी १२ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भुमेश बापू निंबाळकर वय २६ रा. अयोध्या नगर, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर ह्या करीत आहे.