गुन्हेजळगाव शहर

दुचाकी चोर पोलिसांच्या जाळ्यात ; चोरीची दुचाकी हस्तगत

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून याच दरम्यान पोलिसांनी अनेक दुचाकी चोर पकडले आहे. अशातच जळगाव एमआयडीसी पोलिसांनी का मोटार सायकल चोराला अटक केली आहे. अनुराग जाधव (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) असं अटक केलेल्या संशयित दुचाकी चोराचे नाव असून त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

duchaki chor

याबाबत असे की, १ ऑगस्ट रोजी रात्री एका व्यक्तीने आपली दुचाकी क्रमांक एमएच.१९.बीआर.८५३८ ही एचडीएफसी बँकेसमोर लावली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्ह्यात मोटार सायकल चोरीचे गुन्हे वाढत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक नेमण्यात आले होते.

पथकाने तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. त्यावेळी पो.ना.प्रदीप चौधरी आणि पोकॉ विशाल कोळी यांना रामेश्वर कॉलनी, जळगाव येथे चोरीची दुचाकी असल्याची माहिती मिळाली. अधिक तपास केला असता, ती मोटार सायकल अनुराग जाधव वापरत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मोटार सायकल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी अनुराग जाधवला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड मिळाला. याच काळात पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.ना.प्रदीप चौधरी करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button