⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

नोकरीचे आमिष महागात पडले ; सामान्य कुटुंबातील व्यक्तीला ५ लाखात फसविले

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२३ । नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन अनेकांना लाखोंचा गंडा घातला जात आहे. असाच आणखी एक प्रकार समोर आला असून अमळनेर येथील सामान्य कुटुंबातील व्यक्तीची पाच लाख ४० हजार रुपयात फसवणूक केली. याबाबत अमीन पिंजारी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकचालक इकबाल पिंजारी यांनी तक्रार दिली, की अमळनेर येथील तांबापुरा भागात राहणारा पत्नीचा मावस भाऊ अमीन पिंजारी याने घरी येऊन मुलास जळगाव जिल्हा भूमिलेख विभागात नोकरी लावून देतो, असे आमीष दाखवून मार्च ते जून २०२१ या कालावधीत वेळोवेळी पैशांची मागणी करून पाच लाख ४० हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यास भाग पाडले. वेळोवेळी पैसे जमा केले.

परंतु अडीच वर्षे झाले तरी नोकरी मिळत नसल्याने व पैशांची मागणी केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पोलिसात तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी अमीन पिंजारीविरोधात फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक योगेश गणगे तपास करीत आहे