⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

जे.के. इंग्लिश स्कूल येथील वेदिकाने साकारली झाशीची राणीची भूमिका

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२१ । जळगाव येथील रायसोनी नगर  मधील जे.के. इंग्लिश स्कूल या ठिकाणी नर्सरीमध्ये शिकत असलेली वेदिका दिपक सपकाळे या चिमुकलीने स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने झाशीची राणीची भूमिका स्वीकारून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

एकीकडे आपण म्हणतो घराघरात झाशीची राणी जन्माला आली पाहिजे तोच आदर्श घेऊन शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर  वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या बालमनावर शौर्याचे देखील संस्कार घडावे याच उद्देशाने त्यांच्याकडून अशाप्रकारे वेगवेगळ्या रणरागिणी व महापुरुषांची भूमिका स्वीकारून घेतली जात असते.

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे  गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद आहेत, तरी देखील ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणे सुरु आहे. शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारे बाधा येत नाही हे मात्र यातून सिद्ध होत आहे. वेदिका ने एकाच दिवसात संपूर्ण तयारी करून भाषण देखील दिले. वेदिका चे तिच्या शिक्षकांकडून व नातेवाईकांकडून कौतुक होत आहे.