जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी व अमळनेर शहर व्यापारी महासंघाकडून दर सोमवारी जनता कर्फ्यू जाहीर केला असून सोमवारी सकाळपासून शहरातील सर्व दुकाने, बाजारपेठ, भाजीपाला मार्केटमधील सर्व व्यवहार बंद ठेवून जनता कर्फ्यूस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कडकडीत बंद मुळे व्यवहार ठप्प होत असतात,याची जाण व्यापारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत सर्वाना आहे.परंतु कोरोनाची साकडी तोडण्यासाठी हे अत्यावश्यक असल्याची प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी महाराज असोसिएशन चे अध्यक्ष झामनदास सफरमल सैनानी यांनी दिली आहे.
शहरात सर्वत्र नियमांचे पालन करून व्यावसायिक व्यापारी सहकार्य करीत आहेत. बंद मधून वैद्यकीय सेवा, औषधी दुकाने व दूध डेअरींना वगळण्यात आले आहे.