⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

जळगावचा सुपुत्र होणार गुजरातचे मुख्यमंत्री?

जळगावचा सुपुत्र होणार गुजरातचे मुख्यमंत्री?

जळगाव लाईव्ह न्युज । १२ सप्टेंबर २०२१ । गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाने यांनी दिलेल्या तडकाफडकी राजीनाम्या दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोरोना काळात त्यांनी केलेल्या निकृष्ट कामामुळे त्यांना राजीनामा देण्याची वेळ आले असल्याचे जाणकार म्हणत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ज्यांचे नाव आघाडीच्या काही नेत्यांमध्ये घेतले जात आहे ते म्हणजे खासदार सी.आर.पाटील (चंद्रकांत पाटील). चंद्रकांत पाटील हे मूळ जळगाव जिल्ह्यातील असून तेसध्या ते भारतीय जनता पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष आहेत.

गुजरात आणि मराठी माणसाचा वाद हा जूना आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी मुंबई गुजरातकडे वळावी अशी तत्कालीन गुजरात राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांची इच्छा होती. मात्र त्यावेळी ते साध्य होऊ शकले नाही. तेव्हापासूनच गुजरात आणि मराठी माणूस यांच्या मधलं होईल हे सर्वश्रुत आहे. मूळ जळगावचे असलेले चंद्रकांत पाटील हे गुजरातमध्ये स्थायिक झाले आणि आता तिथलेच होऊन बसले आहेत. गुजरातच्या राजकारणात त्यांनी चांगलाच जम बसवला असून सध्या ते गुजरात राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आहेत. ते जर गुजरातचे मुख्यमंत्री बनले तर या सगळ्या समीकरणांना केराची टोपली मिळणार आहे.

सी.आर.पाटील यांचा जन्म 1955 साली जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील पिम्प्री अकाराउत या गावी झाला. त्यावेळी जळगाव मुंबई प्रांताचा भाग होता. 1960 साली भाषावार प्रांतरचनेत महाराष्ट्र आणि गुजरात अशी राज्यं निर्माण झाली. पाटील यांचे कुटुंबीय गुजरातला रवाना झाले.

सी.आर.पाटील यांनी आपलं प्राथमिक शिक्षण दक्षिण गुजरातमधून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी सुरत इथल्या आयटीआय अर्थात इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेतून सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला. 25 डिसेंबर 1989 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत सी.आर.पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. योगायोग म्हणजे वाजपेयी आणि सी.आर.पाटील यांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो.

2009 मध्ये लोकसभा-विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि लोकसभेसाठी नवसारी मतदारसंघ झाला. भाजपने या मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपप्रणित एनडीएला पराभवाला सामोरं जावं लागलं, पण सी.आर.पाटील निवडून आले आणि खासदार झाले.

गणेश उत्सव आणि गोविंदा कमिटी असे सणांचे उपक्रम त्यांनी सुरू केले. मराठा पाटील समाज मंडळ, महाराष्ट्रीयन विकास मंडळ, छत्रपती शिवाजी स्मारक समिती अशा संघटनांच्या माध्यमातून मराठी भाषिक जनतेत त्यांनी लोकप्रियता प्राप्त केली. 2014 निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्यासह निवडून येणाऱ्या उमेदवारांमध्ये सी.आर.पाटील तिसऱ्या स्थानी होते. अव्वल स्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसऱ्या स्थानी गाझियाबाद मतदारसंघातून व्ही.के. सिंग तर तिसऱ्या स्थानी सी.आर.पाटील होते.