---Advertisement---
जळगाव शहर

जय श्रीराम : दिडशे वर्षांची परंपरा लाभलेला जळगावचा आज श्रीराम रथोत्सव

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | २३ नोव्हेंबर २०२३ | जळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेले श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) जळगावचे विद्यमाने कार्तिकी प्रबोधनी एकादशी निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही भव्य श्रीराम रथ यात्रेचे कार्तिकी प्रबोधिनी एकादशी दिनांक २३ नोव्हेंबर 2023 गुरुवार रोजी संपन्न होत आहे. आज पहाटे चार वाजता काकड आरती झाली. त्यानंतर प्रभू श्रीरामांच्या उत्सव मूर्तीस महाभिषेक, सकाळी सात वाजता महाआरती, सकाळी साडेसात ते साडेआठ सांप्रदायिक परंपरेचे भजन त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात सकाळी साडेदहा वाजता श्रीराम रथाचे महापूजन वंशपरंपरेने श्रीराम मंदिर संस्थांचे प्रमुख विश्वस्त, विद्यमान पंचम गादीपती हरिभक्ती परायण मंगेश महाराज जोशी (श्री अप्पा महाराजांचे पाचवे वंशज) यांचे हस्ते करण्यात आले.

jalgaon rath jpg webp

रथाचे अग्रभागी सनई, नगारा ,चौघडा, झेंडेकरी, वारकरी

---Advertisement---

वंशपरंपरेने हरिभक्ती परायण श्री मंगेश महाराजांचे हस्ते श्रीराम रथाचे पूजन व महाआरती झाले. त्यानंतर संस्थानतर्फे उपस्थित प्रमुख अतिथी व रथोत्सवाचे मानकरी सेवाधारी यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्रीराम रथावर आरुढ होणारी प्रभू श्रीरामचंद्रांची उत्सव मूर्तीची आरती होऊन रथावर मूर्ती विराजमान झाली. रथावर गरुड, मारुती, अर्जुन, दोन घोडे इत्यादी मुर्त्या असतात. रथाचे अग्रभागी सनई ,नगारा ,चौघडा, झेंडेकरी ,वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ, श्रीराम भजनी मंडळ तसेच आसपासच्या खेड्यावरील भजनी मंडळी, श्री संत मुक्ताबाईंच्या पादुका असलेली पालखी व त्यामागे श्रीराम रथ असा भव्य दिव्य जलग्राम नगर दिंडी प्रदक्षणा म्हणजेच रथयात्रेस दुपारी बारा वाजता श्रीरामांच्या जयघोषात ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान येथून प्रारंभ झाला.

रथ प्रस्थानाचा मार्ग

श्रीराम मंदिर , भोईटेगढी ,आंबेडकर नगर, तेली चौक, श्रीराम मंदिराचे मागील गल्लीतून, रथ चौक, बोहरा गल्ली, दाणा बाजार, अन्नदाता हनुमान मंदिर, चैतन्य मेडिकल समोरून, प्रकाश मेडिकल, घाणेकर चौक, सुभाष चौक, सराफ बाजारातील श्री महालक्ष्मी मंदिर येथे भजनाचा कार्यक्रम होऊन श्रीमरी माता मंदिर भिलपुरा मार्गे भिलपुरा येथील संत आप्पा महाराजांचे परममित्र श्री संत लालशहा बाबा यांची समाधी येथे श्रीराम रथाचे सेवाधारी रामसेवक पुष्प हार अर्पण करतील. बालाजी मंदिर, रथ चौकात रथ रात्री बारा वाजेपर्यंत परत येईल रामांच्या उत्सव मूर्ती पालखीत ठेवून वाजत गाजत श्रीराम मंदिरात आणण्यात येतील तेथे प्रभू श्रीराम चंद्रांची शेजारती होईल. रथाकरिता अवघ्या महाराष्ट्राच्या विविध भागातून अखंड असंख्य भावी दर्शनासाठी येत असतात प्रत्यक्ष पंढरीचे पांडुरंग जळगाव येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. वारकरी संप्रदायाचे थोर संत श्री राम मंदिरांचे मूळ सत्पुरुष संत अप्पा महाराज यांनी हिंदू समाजातील अठरापगड जाती एकत्र करून हा रथोत्सव सोळा प्रारंभ केला आज गेले 150 वर्षे झाली जळगावकरांच्या असंख्य भाविक नागरिकांच्या सहकाऱ्यांनी हा रथोत्सवाचा नंदादीप अखंडपणे तेवत आहे.

या रथोत्सवाच्या यशस्वीतेसाठी श्री राम मंदिर संस्थांचे प्रमुख विश्वस्त विद्यमान गादीपती हरिभक्ती परायण गुरुवर्य श्री मंगेश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थांचे विश्वस्त मंडळी भरत अमळकर, भालचंद्र पाटील, दादा नेवे, सुशील अत्रे, शिवाजीराव भोईटे, विवेक पुंडे व रथोत्सव समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, दिलीप कुलकर्णी, सदस्य भानुदास चौधरी, विलास चौधरी, संजय चौधरी, सुजित पाटील, पितांबर चौधरी, राजेंद्र काळे, दिगंबर खडके, मुकुंदा पाटील, अरुण मराठे, दिलीप खडके, देवेश पाठक, उदय पाठक, देविदास बारी, मुकुंद धर्माधिकारी, नंदू शुक्ल, महेंद्र जोशी, प्रणव जोशी, विकास शुक्ल, बापू शुक्ल, सुनील शिंपी, सदाशिव तांबट, गणेश दायमा, जितेंद्र वाळके, राजेंद्र जोशी, रमाकांत जोशी, पराग जोशी ,विनायक जोशी, उदय बुवा, तानाजी बारी, केशव बारी, शंकर चौधरी, घनःश्याम चौधरी, दिलीप राजपूत, मधुकर चौधरी, योगेश कासार, संजय कोरके, सुनील पाटील, यशवंत खडके, दिनेश धांडे, गजानन फडणीस, राजू कोळी व समस्त श्रीमान भक्त मानकरी सेवेकरी या मंडळींनी परिश्रम घेतले आहे.

श्रीराम कौशल्यासुत | गावाचे ग्रामदैवत | जमती अपारते भक्त | उत्साहात चालतो उत्सव |
श्रीरामाचा रथोत्सव | उल्हासित सारे जळगाव | जमती अपार लोकसमुदाय | भाव मनीचा उत्संबळे उचंबळे ||

या रथोत्सवात अनेक श्रीराम सेवक आपली सेव अर्पण करत असतात त्यात प्रामुख्याने सर्वश्री पितांबर चौधरी ,यशवंत नेमाडे ,विजय चौधरी, ललित चौधरी , हेमराज पाटील ,जयंत पाटील, महेंद्र पाटील, भालचंद्र चौधरी ,रामकृष्ण पाटील ,शिवाजी पाटील ,प्रकाश चौधरी, योगेश महाजन, योगेश चौधरी, सोपान काळे, वासुदेव महाजन, प्रभाकर खडके, जितेंद्र पाटील, भिका भोई, एकनाथ मिस्त्री, तुकाराम काळे ,अरुण खडके, विकास मिस्त्री, राजेश पाटील, राजू काळे, अनिल तळेले, चुनीलाल खडके, सिताराम काळे, संजय चौधरी, हेमंत खडके, प्रमोद भोळे, विवेक पाटील, पुखराज मणियार, लक्ष्मीनारायण मंडोरे, शाम शिंपी, राजेंद्र ढाके, दिलीप ढाके, पंडित बारी, बुधो बारी, रवींद्र चौधरी, फकीरा बारी, नारायण फेगडे, शेनपडू जावळे, तुकाराम सरोदे, दौलत बारी, भानुदास चौधरी, दगडू चौधरी, शालिक खडके, एकनाथ खडके, भागवत खडके, मुरलीधर खडके, आनंदा खडके, मुकुंद धर्माधिकारी, नंदू शुक्ल, दिगंबर खडके, तुकाराम सरोदे, चिंधू खडके, रामदास पाटील, घनश्याम चौधरी, विकास शुक्ल, दिलीप डाके, दगडू चौधरी, मुकुंद पाटील, देविदास बारी, माणिक खडके, पंडित पाटील, राजेंद्र काळे, अविनाश येवले, वासुदेव पाटील, तानाजी बारी, भरत दत्तू बारी, जगन्नाथ बारी, अमोल खडके, सुनील चौधरी, शंकर चौधरी, शालीग्राम खडके, मोरेश्वर खडके, राजाराम खडके, घनश्याम भंडारी, केशव भंडारी, मोरेश्वर खडके, राजाराम खडके, शेखर दुसाने ,श्रीरंग शुक्ल, विनायक पाटील, गणेश सरोदे, गोकुळ पाटील, यशवंत फडके, रामदास पाटील, दिनेश धांडे, मधुकर चौधरी, सुनील पाटील, किशन चौधरी, रजनीश राणे, विजय नारखेडे, राजू कोळी, महेंद्र जोशी, संजय वडनेरे, रवींद्र जहागीरदार, किशोर नाटेकर, कवी कासार श्रीकांत, देवदत्त मोरे, पवन तिवारी ,हिरा पाटील, खंडू तांबट, सुनील तांबट, संतोष तांबट, भूषण भंडारी शांताराम सराफ, संजय कोरके, प्रकाश गोसावी, श्रीपाद जोशी, सुनील भंडारी, गजानन फडे , चैतन्य जोशी, स्वानंद देवळे, यासं अनेक ज्ञात अज्ञात भक्त मंडळी राम चरणी भक्तिभावाने सेवा अर्पण करत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---