संविधान साक्षरतेसाठी जळगावच्या तरुणाचा सायकलद्वारे ५ हजार किलोमीटरचा प्रवास
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२२ । भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधानाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी जळगाव येथील मुकेश कुरील यांनी सायकल यात्रा काढली. त्यात कुरील हे ३२ जिल्ह्यातून ५ हजार किलोमीटरचा प्रवास करताना संविधान जागर करतील. या यात्रेची सुरूवात काल जळगावपासून झाली. नंतर भुसावळात दाखल होताच बसस्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ त्यांचे स्वागत करण्यात आले.
संविधानाने दिलेले अधिकार, कर्तव्याची माहिती सर्वांना व्हावी, संविधानाचे वाचन व त्यानुसार आचरण व्हावे असा सायकल यात्रेचा उद्देश आहे. २७ फेब्रुवारी ते ९ एप्रिलपर्यंत ही यात्रा चालेल. या यात्रेचे रविवारी भुसावळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, तर वरणगाव येथे बसस्थानक चौकात स्वागत झाले. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
यांची उपस्थिती होती
पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुभाष लोखंडे, किन्ही येथील सर्वोदय हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा चोपडा पं.स.चे माजी सभापती डी.पी.साळुंखे , भुसावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे.पी.सपकाळे, तळवेल येथील पंडित नेहरू विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.एस.अहिरे, संघटना जिल्हाध्यक्ष प्रशांत नरवाडे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे मार्गदर्शक अशोक बाह्रे, इबटा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.आर.धनगर, प्रमोद खैरे, ग.स.सोसायटीचे माजी तज्ञ संचालक योगेश इंगळे, प्राथमिक शिक्षक पतपेढी चे संचालक प्रदीप सोनवणे, रेखा सोनवणे, सुप्रभा आनंद संस्था संचालक निरंजना तायडे, रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचे सचिव जीवन महाजन, आनंद शिंदे, कास्ट्राईब शिक्षक संघटना तालुकाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ चे सचिव सुनील वानखेडे , नीलेश बोरा उपस्थित होते. वरणगाव येथे रॅलीचे स्वागत करण्यात आले.
निवेदन, विचारवंतांची भेट
अनेक लोकांनी अजूनही संविधान वाचले नाही किंवा पाहिले नाही. मात्र, ते वाचल्यास अधिकार व कर्तव्यांची जाणीव होईल. यासाठी प्रबोधनाची जबाबजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे, सर्वसामान्यांना संविधानाची प्रत दाखवून ते वाचण्यास प्रवृत्त करणार आहेत.