⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

ही आजची चित्र रथयात्रा म्हणजे स्वातंत्र्याच्या आठवणी जागविणारी यात्रा : आमदार शिरीष चौधरी

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२२  स्वातंत्र्याच्या इतिहासात अजर अमर असलेली घटना म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस ग्रामीण अधिवेशनफ 1936 साली स्वातंत्र्य लढ्याच्या या मोठ्या पर्वात स्व.धनाजी नाना चौधरी यांच्या सहित भाऊसाहेब बोंडे शंकरराव देव, साने गुरुजी यांचे मोठे योगदान होते. काँग्रेसच्या या भव्य सोहळ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित मदन मोहन मालवीय,डॉ.राजेंद्र प्रसाद,विजया लक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, सरदार वल्लभभाई पटेलसारख्या अनेक हुतात्म्यांनी एका सुरात ब्रिटिशांच्या विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली होती. या सर्व आठवणी ‘चित्ररथ यात्रे’च्या निमित्ताने पुन्हा ताज्या होत असल्याने त्या बद्दल खूप अभिमान वाटतो, असे मत आमदार शिरीष चौधरी यांनी येथे व्यक्त केले.

चित्ररथयात्रेला प्रतिसाद
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, विद्यार्थी विकास विभाग आणि धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत दिनांक गुरुवारी ‘चित्र रथ यात्रा’ आयोजित करण्यात आली. चित्र रथयात्रेलला सकाळी 7.30 वाजता आमदारांनी हिरवी हेंझी दाखवली.

यांची होती उपस्थिती
यापप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विनोद पाटील, संस्थेचे पदाधिकारी, एस.के.चौधरी, के.आर.चौधरी, एम.टी.फिरके, लिलाधर चौधरी, डॉ.जी.पी.पाटील, प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, डॉ.व्ही.आर.पाटील, उप प्राचार्य डॉ.उदय जगताप, प्रा.डी.बी.तायडे, चित्ररथ यात्रा समिती प्रमुख डॉ.जगदीश खरात, समितीतील सर्व सदस्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, एनएसएस, एनसीसी विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित होत्या. या चित्ररथ यात्रेत ऐतिहासिक वास्तू, घटना, उपक्रम, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आंदोलने, स्वातंत्र्याचा इतिहासाबद्दल जाणीव जागृती करणार्‍या अनेक गोष्टींचे चित्र रूपी सादरीकरण करण्यात आले.