⁠ 

सामाजिक न्याय विभागाकडून दिले जाणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार

     जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२२ ।  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांना  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत  1) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजभूषण पुरस्कार 2) साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार 3) पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार 4) संत रविदास पुरस्कार 5) शाहू, फुले, आबेडकर पारितोषिक 6) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते.

          सन 2019-20,2020-21 व 2021-22  या तीनही वर्षासाठी 1) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजभूषण पुरस्कार 2) साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार        3) पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार 4) संत रविदास पुरस्कार 5) शाहू, फुले, आबेडकर पारितोषिक 6) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार          इ. पुरस्कार देण्यात येणार असल्याने सर्व इच्छुक व्यक्ती व संस्था यांनी सन 2019-20,2020-21 व 2021-22  या तीनही वर्षासाठी  स्वतंत्रपणे पुरस्कार निहाय प्रस्ताव तीन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रासह दि. 15 मे, 2022 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,        डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड मायादेवी मंदिरासमोर, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन सहाय्य्‍क आयुक्त, समाज कल्याण योगेश पाटील  यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.