आई-वडील कामानिमित्त बाहेर जाताच घरी एकट्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल..

जानेवारी 5, 2023 5:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२३ । जळगाव शहरातील रायसोनी नगरातील एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. मुकेश सुभाष सोनार (वय-४०) असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

young succied jpg webp

नेमकी काय आहे घटना?

जळगाव शहरातील रायसोनी नगरात मुकेश सोनार हा आई-वडील व मोठा भाऊ यांच्यासह वास्तव्याला होता. गेल्या काही दिवसापासून मुकेश याची पत्नी मुलासह माहेरी गेली आहे. मुकेश हा हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवत होता. बुधवारी त्याची आई कल्पनाबाई सोनार आणि वडील सुभाष नारायण सोनार हे कामाच्या निमित्ताने गावात आले होते. त्यावेळी घरात मुकेश हा घरात एकटाच होता. यादरम्यान मुकेश याने दुपारी घराचा दरवाजा आतून बंद करून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास त्याचे आईवडील हे घरी आले. दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता मुकेशने गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून आईवडीलांनी हंबरडा फोडला. घरातील लोकांनी शेजारचांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी रेवानंद साळुंखे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now