---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

जळगावचा पारा पुन्हा घसरण; यंदाच्या मौसमातल ठरलं सर्वात निचांकी तापमान, आज कसं असेल तापमान?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२४ । उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे जळगावसह राज्यातील तापमानात कमालीची घट झाली आहे. राज्यातील तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून रविवारी जळगावात यंदाच्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. दरम्यान हवामान खात्यानं जळगावसह नऊ जिल्ह्यांना थंडीचा येलो अलर्ट दिला आहे.

TP 1

शनिवारी ८.४ अंशावर असलेला जळगावचा पारा रविवारी पुन्हा घसरून ७.९ अंशांवर स्थिरावला. त्यामुळे सकाळी आणि रात्री प्रचंड गारठा जाणवत आहे. २० डिसेंबरपासून जळगावकरांना थंडीपासून काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याची माहिती हवामान अभ्यासकांकडून देण्यात आली आहे.

---Advertisement---

दहा दिवसांपूर्वी फेंगल चक्रीवादळाच्या परिणामाने थंडीचा जोर कमी होऊन किमान तापमान १८ अंशांवर पोहोचले होते; परंतु आता उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे किमान तापमानात घसरण झाली आहे. चार दिवसांत पारा तीन अंशांनी घसरून रविवारी ७.९ अंशांची नोंद झाली आहे. रब्बीतील ज्वारी, गहू, हरबरा पिकांना या थंडीचा फायदा होणार असून यंदाच्या मौसमातल हे सर्वात निचांकी तापमान असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याच आवाहन करण्यात आले आहे.

जळगावात आज कसं राहणार तापमान?
दरम्यान, आज सोमवारीही कडाक्याची थंडी जाणवू शकते. या दिवशी किमान तापमान ७ ते ९ अंश तर कमाल २८ ते ३० अंश दरम्यान असेल. शीतलहरींमुळे दुपारीही गारठा जाणवत आहे.

राज्यातील नऊ जिल्ह्यांना अलर्ट :
राज्यातील ९ जिल्ह्यांना हवामान खात्याने थंडीचा यलो अलर्ट दिला आहे. जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अहमदनगर, पुणे, पुण्याचा घाटमाथा आणि गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---