⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 23, 2024
Home | गुन्हे | Breaking : जळगावात २ कोटींची रोकड जप्त; पोलिसांच्या कारवाईने खळबळ

Breaking : जळगावात २ कोटींची रोकड जप्त; पोलिसांच्या कारवाईने खळबळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२४ । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात पोलिस प्रशासनाकडून जागोजागी नाकाबंदी करण्यात आली होती. यादरम्यान १ कोटी ९० लाख ६५ हजार ४१२ रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याच्या कारवाईने खळबळ उडाली असून प्रशासनाकडून पुढील चौकशी सुरू आहे.

दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर होताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने मंगळवारी जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान, पोलिसांनी चाळीसगाव ग्रामिण पो.स्टे. हददीतील जामडी येथे लावण्यात आलेल्या एसएसटी पॉइंटवर दुपारी १ वाजेच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान नागदकडुन चाळीसगावकडे जात असलेल्या महिंद्रा वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये ७ लाख २२ हजार ५०० रोख रक्कम मिळुन आली. पोलिसांनी रक्कम जप्त केली असुन ट्रेझरी येथे जमा केली आहे.

कासोदा पोलीस स्टेशन हददीतील फरकांडे फाट्याजवळ ऑल आउट स्किम नाकाबंदी करीत असतांना एरंडोलकडून येणारी पांढऱ्या रंगाची क्रेटा ही सांयकाळी ५.४५ वाजेच्या दरम्यान थांबवून तपासणी केली असता ५०० व १०० दराच्या नोटा मिळुन आल्या. पोलिसांनी रक्कम तपासली असता १ कोटी ४५ लाख रुपये असल्याचे समजते. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

भडगाव पोलीस स्टेशन हददीतील पारोळा चौफुली भडगाव येथे नाकाबंदी दरम्यान वाहनाची तपासणी करताना १ लाख ४९ हजार रुपये रोख मिळुन आली असून सदर रक्कम पुढील कारवाईसाठी पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघातील एफएसटी पथक क्र.३ यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. जामनेर पोलीस स्टेशन हदीतील नेरी येथे नाकाबंदी दरम्यान एक इसमाच्या ताब्यातुन ४ लाख ४६ हजार १२० रुपये मिळून आल्याने ते जप्त करण्यात आलेले आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.