---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

ढगाळ वातावरणामुळे जळगावचा पारा घसरला; उकाड्यातून दिलासा, आगामी दिवस असं राहणार हवामान?

tapman
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२५ । जळगावसह राज्यात सध्या ऊन-पावासाचा खेळ सुरू काही दिवसापूर्वी चाळीशी गाठलेल्या तापमानात ढगाळ वातावरणामुळे घट झाली आहे. गुरुवारी जळगावचा दिवसाचा पारा ३७ अंशांवर आला होता. तर रात्रीचा पारा ही १५.४ अंशांवर आला होता.

tapman

दरम्यान राज्यातील काही भागात हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. जळगाव जिल्ह्यात देखील ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. यामुळे सध्या जळगावात ढगाळ वातावरणामुळे तापमान एक अंशाने घसरले. पारा बुधवारी ३८.२ अंशांवर होता तो गुरुवारी ३७. ४ अंशांपर्यंत खाली आल्याने दिलासा मिळाला.

---Advertisement---

दरम्यान, शहरासह जिल्ह्यात २३ ते २५ मार्च दरम्यान तीन दिवस असेच ढगाळ वातावरण राहील. त्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी तुरळक पाऊस होऊ शकतो. पारच्या तापमानात काहीशी घट होईल. पारा सध्यापेक्षा दोन ते तीन अंशाने खाली येईल. त्यामुळे या आठवड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही, असा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment