जळगावकरांनो सांभाळा : तापमानात होत आहे कमालीची वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२३ । फेब्रुवारी महिना संपत आला आहे. मात्र यंदा उन्हाचा पारा चांगलाच चढलेला पाहायला मिळत आहे. रविवारी तापमान ३६ डिग्री होते. तर सोमवारी तापमान ३५ डिग्री आहे.येत्या काही दिवसात तापमान वाढण्याची शक्यता आहे.

मागच्या काही दिवसांपासून मे-जूनसारखी उष्णता फेब्रुवारीमध्येच जाणवत आहे. त्यातच मार्च महिन्यातच यंदा‎ मे हीटची प्रचिती येणार‎ असल्याची शक्यता आहे. येत्या २८‎ फेब्रुवारीपासून उत्तर महारा‌ष्ट्रात‎ तापमानात वाढ हाेईल. पारा‎ चाळिशीपुढे जाण्याची शक्यता‎ हवामान विभागाकडून वर्तवण्यात‎ आली आहे.

गेल्या दाेन‎ दिवसांपासून उन्हाचे बसणारे चटके‎ हे त्याचेच संकेत असल्याचे समाेर‎ येते आहे. विशेष म्हणजे यंदा‎ उन्हाळ्याच्या पंधरा दिवस आधीच‎ उन्हाचे चटके बसू लागले आहेत.‎सकाळी नऊ वाजेपासूनच शरीराला उन्हाचे चटके जाणवत आहेत.

सामोवारी तापमान ३६ डिग्री होते. मंगळवारी तापमान ३७ डिग्री असणार आहे. बुधवारी तापमान ३७ डिग्री असणार आहे. गुरुवारी तापमान ३७ डिग्री असणार आहे. शुक्रवारी तापमान ३८ डिग्री असणार आहे. शनिवारी तापमान ३८ डिग्री असणार आहे. रविवारी तापमान ३८ डिग्री असणार आहे.

२०१४ मध्ये २५ फेब्रुवारी रोजी तापमानाचा पारा 33.४ अंश सेल्सिअस होता. २०१९ मध्ये २८ फेब्रुवारी रोजी ३७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली होती. तर २६ फेब्रुवारी २०१३ रोजी तापमान ३६ अंश नोंदविले गेले आहे.