हतनूर धरणाच्या 24 व्दारांमधून 1,18,658 क्युसेक्स एवढा होता विसर्ग ;वाघूर च्या 10 व्दारांमधून 16,393 क्युसेक्स होता विसर्ग
जळगाव लाईव्ह न्यूज । या वर्षी अनेक वर्षानंतर विक्रम पावसाची नोंद झाली. त्यामुळे 3 सप्टेंबर 2024 रोजी हतनूर धरणाच्या 24 व्दारांमधून 1,18,658 क्युसेक्स ऐवढा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आलेला होता. तर 3 सप्टेंबर 2024 रोजी वाघूर धरणाच्या 10 व्दारांमधून 16,393 क्युसेक्स ऐवढा विसर्ग वाघूर नदी पात्रात सोडण्यात आलेला होता. या कालावधी दरम्यान मोठ्या प्रमाणावर पाऊस असल्यामुळे जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनानुसार पुर नियंत्रणाची कार्यवाही करण्यात आल्यामुळे पुराच्या पाण्यामुळे होणारे नुकसान टळल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून सांगितले.
काय असते प्रक्रिया
तापी खो-यातील पूराच्या वेळेस नद्यावरील मोठया, मध्यम व लघु प्रकल्पाच्या धरणातून सांडव्यावरुन वेळोवेळी किंवा तातडीची परिस्थिती उद्भवल्यास धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नदी पात्रात काही प्रमाणात पाणी सोडण्याची वेळ येते. त्यावेळेस एकाचचेळी सोडलेल्या विसर्गामुळे धरणाखालील गावांना नदी खो-यातील नैसर्गिक कारणांमुळे धोका निर्माण होवू शकतो.
मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव यांच्या निर्देशानुसार पावसाळयात, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव यांच्या अधिपत्याखालील तापी खो-यातील सर्व धरणाखालील भागातील पूर परिस्थितीचे योग्य पध्दतीने नियंत्रण करण्याच्या दृष्टीने पूर नियंत्रण अधिकारी म्हणून मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव, पुरनियंत्रण समन्वय अधिकारी, पूर नियंत्रण कक्ष म्हणून अधिक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगांव यांच्या अधिपत्याखालील जळगांव पाटबंधारे विभाग,यांच्या कार्यालयात पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. कार्यकारी अभियंता, जळगांव पाटबंधारे विभाग,हे जिल्हा पूर नियंत्रण समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत असते.
तापी पाटबंधारे विकास महामंडळांर्तगत असलेल्या जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व मोठ्या, मध्यम व लघु पाटबंधारे तलावांचे १ जुन ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत पावसाळ्यानिमित्त दररोजच्या पाणी साठ्याची माहिती सर्व शासकीय यंत्रणेला देण्याकरीता महामंडळाने जळगाव पाटबंधारे विभागाकडे हि जबाबदारी सोपवलेली आहे. त्यासाठी उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग जामनेर यांच्यासह त्यांचे कार्यरत शाखाधिकारी यांचे अधिपत्याखालील २४ तास तीन पाळ्यांमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, संगणक परिचालक व कुशल मदतनीस पुर नियंत्रण कक्षामध्ये कार्यान्वीत आहेत.
दररोज सकाळी ८.०० वाजता गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव मार्फत प्राप्त होणा-या जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व मोठ्या, मध्यम व लघु पाटबंधारे तलावांच्या पाणी साठ्यांची दैनंदिनी तयार करुन, सदर दैनंदिनी मंत्रालय, जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व महसुल व पोलिस कार्यालय, जलसंपदा कार्यालय व सर्व संबंधित अधिकारी यांना ई-मेल व्दारे पाठविणे. दररोज १ तासाने हतनुर, वाघुर व गिरणा या मोठ्या प्रकल्पांच्या पाणी साठ्यांची नोंद पुरनियंत्रण कक्षात अद्यावत करुन ठेवणे. दररोज सकाळी 8 ते 8.30 वाजेदरम्यान व संध्याकाळी 5 ते 6 वाजेदरम्यान तापी खोरे अंतर्गत येणा-या मोठ्या प्रकल्पांची पाणी पातळी, त्या दिवसाचा पाऊस व विसर्गाबाबत मंत्रालयीन स्तरावर कार्यान्वीत भ्रमणध्वनी वाट्सग्रुपवर व अतिरीक्त मुख्य सचिव तसेच सचिव जलसंपदा यांना देखील कळविण्याची कार्यवाही केली जाते.
हतनुरसह इतर मोठ्या धरणतुन सोडण्यात येणारा पाणी प्रवाह ५००० क्युसेक्स पेक्षा जास्त सोडण्यात येणार असेल तर जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व महसुल यंत्रणा (जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलीस पाटील, तलाठी) व पोलिस विभाग (पोलिस अधिक्षक, पोलिस उपअधिक्षक, पोलिस निरीक्षक) पाटबंधारे विभाग, मंत्रालय स्तरावर स्थापन करण्यात येणा-या पुरनियंत्रण कक्षास तसेच अंतरराज्यीय प्रकल्प, उकई येथे स्थापन करण्यात आलेल्या पुरनियंत्रण कक्षास प्रत्येक तासाला दुरध्वनी व्दारे कळविण्यात येते. जळगाव येथे पुराच्या माहिती करीता जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या पुरनियंत्रणकक्षात कळविण्यात येते. पुरनियंत्रण कक्षाकरीता स्थापन करण्यात येणा-या भ्रमणध्वनीच्या वाट्सग्रुपवर देखील सदर आपातकालीन संदेश पाठविण्यात येतात.
जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग
दिनांक 3/09/2024 रोजी हतनूर धरणाच्या 24 व्दारांमधून 1,18,658 क्युसेक्स ऐवढा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आलेला होता. तसेच दिनांक
3/09/2024 रोजी वाघूर धरणाच्या 10 व्दारांमधून 16,393 क्युसेक्स एवढा विसर्ग वाघूर नदी पात्रात सोडण्यात आलेला होता. या कालावधीत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे जलसंपदा विभागाच्या वरीष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी जळगांव यांच्या मार्गदर्शना नुसार पुर नियंत्रणाची कार्यवाही करण्यात आल्यामुळे पुराच्या पाण्यामुळे होणारे नुकसान टाळण्यात आलेले आहे
मुख्य अभियंता तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव, अधिक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव व कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन कक्ष यांच्या वेळोवेळीच्या मार्गदर्शन व सुचना नुसार पुरनियंत्रण कक्षाने हे काम आज पर्यंत अत्यंत सुरळीतपणे पार पाडले.