⁠ 
[rank_math_breadcrumb]

जळगावकरांना सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; या तारखेपासून बदलेल वातावरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ संप्टेंबर २०२४ । जळगावसह राज्यात पावसाने उसंती घेतल्यामुळे तापमानात वाढ झाली. जळगावचे तापमान ३५ अंशापर्यंत गेल्याने जळगावकरांना सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा बसताना दिसत आहे. सध्या जिल्ह्यात ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळत असून ढगाळ वातावरण असूनही उष्णता जाणवत आहे. तापमानात वाढ झाल्याने दुपारच्या वेळेस अंगातून घामाच्या धारा वाहत आहे. मात्र जळगावकरांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

कारण जळगाव शहरासह जिल्ह्यात २४ ते २९ सप्टेंबर दरम्यान ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात काही प्रमाणात गारवा असेल. पंरतु तारखेनंतर तापमानात कमालीची वाढ होणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमान ३५ ते ३६ अंशांपर्यंत गेल्याने जळगावकरांना ऑक्टोबर हीटचा तडाखा बसणार आहे.

बंगालच्या उपसागरातील सक्रिय कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज होता. जळगाव जिल्ह्याला देखील २३ आणि २४ सप्टेंबर रोजी पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला होता. परंतु सध्या पितृपक्ष सुरू असून यात तापमान वाढल्याने पावसाच्या धारा ऐवजी अंगातून घामाच्या धारा वाहत आहे.

ऑक्टोबर महिन्यात तापमान ३६ अंशांपर्यंत पोहोचेल. ऑक्टोबरच्या शेवटी थंडीला सुरुवात होईल आणि पुन्हा हळूहळू तापमान घसरायला सुरुवात होईल. नोव्हेंबरमध्ये परतीचा पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसांपासून हवामान ढगाळ आहे. आज सोमवारी मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.