जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२२ । शहरात खुनाची मालिका सुरूच असून आज शनिवारी दुपारी पुन्हा एका तरुणाच्या खुनाने जळगाव हादरले आहे. शिवाजीनगर हुडकोत ३५ वर्षीय तरुणाचा खून झाला आहे. नरेश आनंदा सोनवणे (वय-३५) असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, घटनास्थळी पोलीस पोहचले असून माहिती घेणे सुरू आहे.
शुक्रवारी रात्री काल शहरातील समतानगरात तरुणाच्या मानेवर वार करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेच्या अवघ्या एकही तासात शहरात दुसरा खून झाला आहे. नरेश आनंदा सोनवणे या तरुणाचा खून झाला असून तो रिक्षा चालून आपल्या कुटुंबियांचे उदारनिवार्ह करीत होता.
घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड हे पथकासह पोहचले आहेत. खून कशामुळे झाला, कुणी केला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले तरी चॉपरने वार केल्याने खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, जळगावमधील वाढती गुन्हेगारी पोलिसांना आव्हान देणारी ठरते आहे. छोट्या मोठ्या गोष्टींवरून जीवे मारणे म्हणजे शुल्लक बाब झालेली दिसून येते. शहरासह जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी जी वाढती आहे ती निश्चितच पोलिसांची डोके दुखी वाढवणारी ठरू पाहत आहे.
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज