⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगावकरांची प्रतीक्षा संपली ! जळगाव-मुंबई विमानसेवा ‘या’ तारखेपासून सुरु होणार

जळगावकरांची प्रतीक्षा संपली ! जळगाव-मुंबई विमानसेवा ‘या’ तारखेपासून सुरु होणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२४ । मुंबई-जळगाव-मुंबई या विमान सेवेला नागरी उड्डयन मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला असून ही विमानसेवा कधी सुरु होईल याची जळगावकर आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र आता जळगावकरांची प्रतीक्षा संपली आहे. भारत सरकारच्या ‘अलायन्स एअर’ या विमान कंपनी १६ जूनपासून मुंबई-जळगाव अशी विमानसेवा सुरू करणार आहे. यामुळे आता जळगावहुन मुंबई विमान सेवा सुरू झाल्यावर अर्धा ते एक तासात मुंबई गाठता येणार आहे.

खरंतर जळगाव विमानतळावरून अनेक वर्षांपासून विमानसेवा बंद होती. दोन महिन्यापूर्वी म्हणजेच एप्रिलमध्ये उडान योजनेअंतर्गत ‘फ्लाय ९१’ विमान कंपनीकडून हैदराबाद आणि गोवा विमानसेवा सुरु करण्यात आली. याला मिळणार प्रतिसाद बघून कंपनीने जळगाव ते पुणे विमानसेवाही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु केली.

यांनतर जळगाव-मुंबई विमानसेवा सुरु करण्याची मागणी होत होती. दरम्यान, जळगाव शहरातील लोक शिक्षण, पर्यटन, नोकरी, व्यवसाय अशा विविध कामांसाठी राजधानी मुंबईत येतात. मात्र, सध्या जळगाव शहरातून मुंबईला जाण्यासाठी प्रवास किंवा रेल्वेचे पर्याय उपलब्ध आहेत.रेल्वेने प्रवास करायचा असेल तर साधारण आठ तासांचा प्रवास करावा लागेल आणि ट्रॅव्हल्सने प्रवास करायचा असेल तर दहा तासांपेक्षा जास्त वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे मुंबईत येणे आणि काम उरकून घरी जाणे कठीण होते. रेल्वे आणि ट्रॅव्हल्स कामी येतात. त्यामुळे या मार्गावर नवीन विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी अनेकांकडून होत होती.

अखेर केंद्राच्या उडान योजनेअंतर्गत मुंबई जळगाव-मुंबई या विमान सेवेला नागरी उड्डयन मंत्रालयाकडून ३१ मे रोजी हिरवा कंदील मिळाला. यानंतर आता मुंबई- जळगाव-मुंबई या विमानसेवेला १६ जूनपासून सुरुवात होत आहे. ‘अलायन्स एअर’या विमान कंपनीकडून सुरुवातीला आठवड्यातून दोन दिवस मुंबई- जळगाव सेवा चालविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रतिसाद पाहून ही सेवा नियमित केली जाणार आहे. मुंबई-जळगाव विमानसेवा सुरू झाल्याने अर्ध्या ते एक तासात मुंबई गाठता येणार आहे. व्यावसायिकांना या सेवेचा मोठा फायदा होणार आहे.

अहमदाबाद- जळगाव विमान सेवाही सुरू होणार?
मुंबईप्रमाणे गुजरात येथील अहमदाबादमध्येदेखील उद्योग व व्यापार तसेच कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. मागणीनुसार ‘अलायन्स एअर’ अहमदाबाद- जळगाव-अहमदाबाद सेक्टरवरही सेवा सुरू करणार असून लवकरच तारीख जाहीर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.