जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२१ । चाळीसगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार मंगेश चव्हाण यांना मंगळवारी मुंबई येथे मंत्रालय परिसरात विनामास्क फिरत असल्याने कारवाईला सामोरे जावे लागले आहे. पोलिसांनी त्यांना २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात शासनाने कठोर भूमिका घेतली आहे. मुंबईत विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी मंत्रालयात पोलीसांनी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर कारवाई केली आहे. मंत्रालयातून बाहेर पडताना मास्क नसल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आ.मंगेश चव्हाण यांना पोलीसांनी 200 रुपयांचा दंड ठोकला आहे.
माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना आमदार मंगेश चव्हाण यांनी, कायदा सर्वांसाठी सारखा आहे. मी कायदा मोडल्याने कारवाई झाली त्यात काही गैर नाही. मी मास्क लावलेला नसल्याने पोलिसांनी माझ्याकडून २०० रुपये घेतले. खरे तर या सरकारमध्ये सर्वत्र जोरदार वसुली सुरु आहे परंतु या कायद्याच्या वसुलीचे मी कौतुक करेल. मी माझ्या मतदारसंघात गरिबांना लुटण्याचे स्टिंग मी केले होते. या सरकारने त्यात लक्ष घालून दोषींना शिक्षा द्यावी. आजच्या कारवाईचे काही वाईट वाटत नसल्याचे आ.चव्हाण यांनी सांगितले.
जळगावच्या ‘या’ आमदाराला मास्क नसल्याने मुंबईत दंड
