⁠ 
सोमवार, मे 27, 2024

स्मिताताई वाघ यांच्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त  प्रतिसाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२४ । जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ आज जळगाव ग्रामीण भागातील गाढोदा या गावी पदयात्रा करण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन करण्यात आली. या पदयात्रेला गावातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या पदयात्रेत सामील सर्व गावकऱ्यांशी गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात संवाद साधला.

याप्रसंगी सर्वांना महायुतीचा उमेदवार म्हणून मतदान करण्याची साद घातली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडेच पुन्हा देशाचे नेतृत्व देण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्याची हाक दिली. त्यावर सर्वांनीच याकामी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

यांची होती उपस्थिती :
यावेळी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, प्रभाकर पवार, डॉ. राधेश्याम चौधरी, मुकुंदाभाऊ रोटे, प्रभाकरआप्पा सोनवणे, गोपाल फकीरचंद पाटील, भगवान चावडा, मनोहरदादा पाटील, डॉ. कमलाकर पाटील, अनिल भोळे, राजूभाऊ सोनवणे, हर्षल चौधरी, जितेंद्र पाटील, सचिनभाऊ पवार, शालीक पाटील, भाऊसाहेब पाटील, शिवराज पाटील, समाधान सोनवणे, समाधान सपकाळे, किसन अण्णा पाटील, नानाभाऊ पाटील, अरविंद सपकाळे, बाळा शेठ, भोलाभाऊ पाटील, प्रमोद सोनवणे, मिलिंद चौधरी, अरुण सपकाळे, सुदाम राजपूत, अमोल पाटील, विठ्ठलभाऊ, जयराम तात्या, भूषण पाटील यांसोबत महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.