⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

‘जळगाव लाईव्ह न्यूज’ ची गुगल न्यूज इनिशेटीव्ह उपक्रमात सलग दुसऱ्या वर्षी निवड

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२३ । जळगावकरांचं हक्काचं व्यासपीठ असलेल्या ‘जळगाव लाईव्ह न्यूज’ पोर्टलची (Jalgaon Live News) गुगल न्यूज इनिशेटीव्ह (Google News Initiative) या विशेष उपक्रमात सलग दुसऱ्या वर्षी निवड झाली आहे. देशभरात स्थानिक भाषांमध्ये मजकुर प्रकाशित करणाऱ्या १५० न्यूज पोर्टल्सची गुगल न्यूज इनिशेटीव्ह मध्ये दरवर्षी निवड करण्यात येत असते. जळगावकरांनी भरभरुन दिलेल्या प्रेमामुळे जळगाव लाईव्ह न्यूजची सलग दुसऱ्या वर्षी जीएनआयमध्ये निवड झाली आहे.

संपूर्ण भारतात विविध भाषांमध्ये दर्जेदार मजकुर (बातम्या/लेख/विश्लेषण) प्रसिध्द करणार्‍या ऑनलाईन फ्लॅटफॉर्मची दरवर्षी गुगलकडून निवड करण्यात येते. गतवर्षी या प्रतिष्ठेच्या उपक्रमात मराठी भाषेकरीता जळगाव लाईव्हची निवड झाली होती. त्यानंतर डिसेंबर २०२१ ते मे २०२२ या कालावधीत गुगल इंडियातर्फे जळगाव लाईव्ह न्यूजला विशेष सहकार्य करण्यात आले. अधिक दर्जेदार व विश्वसनिय मजकुर प्रकाशित करणे, प्रसिध्द झालेला मजकुर व्हायरल करणे, ऑनलाइॅन रेव्हेन्यू वाढविणे आदींबाबत विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यासह गुगलकडून काही विशेष तांत्रिक सहकार्य देखील पुरविण्यात आले होते.

गुगल कडून मिळालेल्या या तांत्रिक सहकार्याच्या जोरावर जळगाव लाईव्हने अवघ्या सहा महिन्यात नवं नवे विक्रम करत मोठी उंची गाठली. गतवर्षात जळगाव लाईव्ह न्यूजनेत तब्बल २ कोटी ८१ लाख ३१ हजार ८६१ व्ह्यूज मिळवले आहेत. २४ फेब्रुवारी २०२० मध्ये जळगाव लाईव्हची सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत ७ कोटी ६६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. फेसबुकवर १ लाख २६ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. इतकंच नव्हे तर फेसबुकचा रिच दरमहा कोटींमध्ये असतो.

ऑनलाईन पोर्टलच्या भाऊगर्दीत स्वत:ची वेगळी वाट निवडणार्‍या ‘जळगाव लाईव्ह न्यूज’ पोर्टलची गुगल न्यूज इनिशेटीव्हमध्ये सलग दुसऱ्या वर्षी निवड होणे ही सर्व जळगावकरांसाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे. ऑनलाईन पोर्टलमध्ये अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या गुगल न्युज इनिशेटीव्हमध्ये जळगाव लाईव्ह न्यूजची निवड झाल्यामुळे आमच्या प्रामाणिककामाची पावती मिळाली असल्याची भावना टीम जळगाव लाईव्ह न्यूजतर्फे व्यक्त करण्यात आली.