⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | विशेष | जाणून घ्या उद्यापासून.. जळगावातील गणेशोत्सवाचा उत्कंठावर्धक इतिहास

जाणून घ्या उद्यापासून.. जळगावातील गणेशोत्सवाचा उत्कंठावर्धक इतिहास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यात गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली, गणेशोत्सव सार्वजनिकरित्या कसा नावारूपास आला, जिल्ह्याच्या गणेशोत्सवात काय-काय नवनवीन घडले, कोणती आरास ६ महिने होती, ३ मजली शीश महाल कुणी उभारला, सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूक केव्हा सुरु झाली, मिरवणुकीला गालबोट का लागले, मंडळांना परवानगी कशी मिळत होती, सार्वजनिक गणेश महामंडळ कसे सुरु झाले, ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचा जळगावच्या गणेशोत्सवाशी काय संबंध, कोणत्या मुस्लीम बांधवांच्या समन्वयामुळे मिरवणूक शांततेत पार पडते? असे कितीतरी प्रश्न जळगावकरांच्या मनात येत असतील.

जिल्ह्यातील गणेशोत्सवाचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी जळगाव लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून आम्ही काही किस्से यावर्षीच्या गणेशोत्सवात आपल्या समोर मांडणार आहोत. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे सचिन नारळे यांच्याशी गप्पा केल्यानंतर रोचक आणि उत्कंठावर्धक इतिहास समोर आला आहे.

महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाल्यानंतर गेल्या वर्षीच लोकमान्य टिळक स्मृती शतक वर्ष साजरे करण्यात आले. यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाचे १३९ वे वर्ष आहे. शतकोत्तर परंपरा असलेला उत्सव म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव आहे. लोक जागरण, स्वदेशी भक्ती समरसता आणि धर्म सेवा प्रत्येकाच्या मनात रुजावी हा हेतू गणेशोत्सवातून साधण्यात येत असतो.

गणेशोत्सवावर काळाच्या ओघात अनेक आघात झाले तरीही अनेक आव्हानांना पुरून उरत इथपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव पोहचला आहे. गणेशोत्सवाने जगाला शेकडो साहित्यिक, कलावंत आणि राजकीय, सामाजिक नेतृत्व दिले. महाराष्ट्रात सुरु झालेला सार्वजनिक गणेशोत्सव आज जगभर साजरा केला जातो. गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून एक जीवनपट आहे.

जळगावात आज हजारो सार्वजनिक गणेश मंडळ असले तरी सुरुवातीला बोटावर मोजण्याइतकेच मंडळ होते. अनेक खडतर अडचणींचा सामना करून आजचा सार्वजनिक गणेशोत्सव याठिकाणी येऊन पोहचला आहे. भविष्यात देखील अनेक मंडळे येतील आणि जातील देखील परंतु समाजाचे प्रबोधन करण्यासाठी आपल्या वडीलधाऱ्यांना आणि जेष्ठांनी काय मेहनत घेतली हे जाणून घेणे सर्व गणेश भक्तांसाठी आवश्यक आहे.

जिल्ह्यात आज सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची एक मोठी चळवळ उभी राहिली आहे. सार्वजनिक गणेश महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांच्याशी केलेल्या गप्पांमधून उलगडलेला जळगावातील गणेशोत्सवाचा रोचक इतिहास जाणून प्रत्येक गणेशभक्त अभिमानाने जळगावची ख्याती सर्वदूर पोहचवेल यात शंका नाही.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.