बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

जळगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत ‘या’ रिक्त पदांवर भरतीची घोषणा! पात्रता जाणून घ्या..

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव या संस्थेतील रिक्त जागा भरल्या जाणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या रिक्त जागांवर माहे ऑगस्ट/सप्टेंबर, 2023 पासून तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर निदेशकांची नियुक्ती करावयाची आहे.

ही पदे भरली जाणार?
शिल्प निदेशक, यंत्रकारागीर 7 पदे, यांत्रीक घर्षक 2 पदे, मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स 3 पदे, विजतंत्री 5 पदे, रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनिंग 2 पदे, जोडारी 6 पदे, यांत्रीक कर्षिक 1 पद, साचेकाम 1 पद, टूल ॲण्ड डा मेकर (जिंग्ज ॲण्ड फिक्स्चर) 1 पद, इन्स्टूमेंट मेकॅनिक 1 पद, यांत्रीक मोटारगाडी 2 पदे, यांत्रीक डिझेल 2 पदे, संधाता 3 पदे, कातारी 2 पदे, मेकॅनिक मशिन टूल मेंटेनस 2 पदे, ऑपरेटर ॲडव्हान्स मशिन टूल्स 1 पद, गणित/चित्रकला निदेशक 8 पदे, एम्प्लॉयएबिलिटी स्कील्स 4 पदे, एम्प्लॉयएबिलिटी स्कील्स 4 पदे याप्रमाणे पदे रिक्त आहेत.

शैक्षणिक पात्रता- संबंधीत विषयातील अभियांत्रीकी शाखेची पदविका/पदवी किंवा संबंधीत व्यवसायात आयटीआय उत्तीर्ण आवश्यक. एम्प्लॉएबिलिटी स्कील करीता शैक्षणिक पात्रता BBA/MBA किंवा कुठल्याही शाखेचा पदवीधर/कुठल्याही शाखेची पदवीका व संबंधीत क्षेत्रातील 2 वर्षाचा अनुभव तसेच इंग्रजी व संपर्क कौशल्य तसेच संगणक विषयीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

संबंधीत क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य, उपलब्ध जागांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या प्रतींसह 20 जुलै, 2023 पर्यंत संस्थेच्या कार्यालयात सादर करावे. मुलाखतीची दिनांक व वेळे दुरध्वनीव्दारे कळविण्यात येईल. असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.