⁠ 
मंगळवार, मे 21, 2024

जळगाव स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. विलास भोळे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सचिवपदी डॉ.शीतल भोसले ; संघटनेचा पदग्रहण सोहळा उत्साहात

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२४ । जळगाव स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेचा पदग्रहण सोहळा शहरातील एका हॉटेलात मोठ्या उत्साहात पार पडली. स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. विलास भोळे तर सचिवपदी डॉ. शीतल भोसले यांची निवड करण्यात आली.

जळगाव स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेचा पदग्रहण सोहळा गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांचे अध्यक्षतेखाली व डॉ. अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पारप डला. यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेचे नूतन अध्यक्ष डॉ विलास भोळे यांनी मावळते अध्यक्ष डॉ. सीमा पाटील यांचेकडून पदभार स्विकारला.

तसेच डॉ शीतल भोसले यांनी नूतन सचिव म्हणून डॉ दिप्ती पायघन यांचेकडून पदभार स्विकारला. नूतन कार्यकारणीत डॉ. विनोद चौधरी वरणगाव, डॉ. भावना चौधरी, डॉ. संदिप पाटील, डॉ. स्वप्निल रावेरकर, डॉ. प्रशांत पाटील, डॉ श्रद्धा पाटील, डॉ पूनम येवले , डॉ.नितीन चौधरी,डॉ. प्रियंका चौधरी,डॉ. योगिता पाटील, व डॉ. जया शिंदे ह्यांनी पदभार स्विकारला. डॉ श्रद्धा पाटील व डॉ प्रियंका चौधरी ह्यांनी सूत्रसंचालन केले व डॉ प्रशांत पाटील ह्यांनी आभारप्रदर्शन केले. संघटनेच्या माध्यमातून अधिकाधिक समाजाभिमुख उपक्रम हाती घेऊन जळगाव जिल्यातील स्त्रियांच्या आरोग्याबद्दल जनजागृती करण्याचा मानस डॉ शीतल अविनाश भोसले ह्यांनी व्यक्त केला.