⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगाव जीएसटी घोटाळा : मुख्य संशयित पिंटू इटकरेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

जळगाव जीएसटी घोटाळा : मुख्य संशयित पिंटू इटकरेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ । जळगाव जीएसटी घोटाळ्याप्रकरणी महासंचालनालयाच्या केंद्रीय पथकाने जोरदार कारवाई करणे सुरु केले आहे. आज मुख्य संशयित पिंटू इटकरेला नाशिक न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे अनेक दिगज्जांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत अधिक माहित अशी कि, डीजीजीआयचे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी ब्रिज भूषण त्रिपाठी यांच्या पथकाने बुधवारी ही धाड टाकली होती. यावेळी एका स्टील कंपनीच्या जीएसटीच्या पत्त्यावर चक्क मेडिकल सुरु असल्याचे आढळून आले होते. तर अन्य एकाला आपल्या नावावर स्टील कंपनी असल्याचे माहितच नव्हते. डीजीजीआयच्या पथकाने जळगावमधून पिंटू इटकरे या दोघांना ताब्यात घेतले होते.

सूत्रांच्या अंदाजानुसार हा जीएसटी घोटाळा १०० कोटीच्या घरात आहे. जवळपास १०० हून अधिक खात्यातून हा व्यवहार झाला असून मुख्यसूत्रधार तथा लाभार्थी जळगावचा असल्याचे समोर आले आहे.

author avatar
Tushar Bhambare