जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२५ । सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदवार्ता आहे. ती म्हणजे सोन्याच्या दरात सुरू असलेल्या तेजीला ब्रेक लागला असून आता घसरणीला सुरुवात झाली आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत सलग दुसऱ्या दिवशी सोन्यासह चांदी दरात घसरण झालीय. ऐन लग्नसराईमध्ये भाव घसरल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जळगावच्या सराफ बाजार व्यवहार बंद होण्याच्या शेवटच्या दिवशी सोने दरात प्रति १० ग्रॅम १४०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे प्रति तोळ्याचे दर ९० हजार रुपयांखाली आले. तर चांदीतही प्रति किलोमागे ४ हजार रुपयांची घसरण झाली. दरम्यान, ही घसरण ट्रम्प सरकार बिटक्वॉइन विकत घेणार असल्याच्या वृत्ताचा परिणाम असल्याचे जाणकारांचे मत आहे
मागील काही दिवसापासून दोन्ही धातूंमध्ये वाढ होताना दिसत दिसून आली. यामुळे सोन्याचे दर दररोज नवनवीन विक्रम गाठत होता. मात्र गेल्या दोन दिवसापासून सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोबतच चांदी दरात देखील मोठी घसरण झाली. गेल्या दोन दिवसात सोने दरात १७०० रुपयांनी तर चांदी दरात तब्बल ६००० हजार रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे स्वस्तात सोने चांदी खरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.