सोने - चांदीचा भाव

सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी स्वस्त; जळगावच्या सुवर्णगरीत आता 10 ग्रॅमसाठी..

जळगाव लाईव्ह न्यूज । दसरा आणि दिवाळी सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपले असून त्यापूर्वीच सोन्यासह चांदी दरात घसरण होताना दिसत आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत आज सलग दुसऱ्या दोन्ही धातूंमध्ये घसरण झाली. त्यामुळे सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस काहीसा

जळगाव सराफ बाजारात आज मंगळवारी (६ ऑक्टोबर) सकाळी १० ग्रॅम सोन्याच्या दरात ५०० रुपयांची घट झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचा दर जीएसटीसह १ लाख ५१ हजार ९२५ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे.

दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. एक किलो चांदीच्या दरात २ हजार रुपयांची घट झाली असून, जीएसटीसह चांदीचा दर २ लाख ३१ हजार ७५० रुपये प्रति किलो इतका झाला आहे.

दसरा आणि दिवाळीच्या सणाला सोने खरेदी शुभ मानले जाते. त्यामुळे सणासुदीचा काळ जवळ येत असताना सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण होणार की पुन्हा तेजी येणार, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात दरांमध्ये होणाऱ्या चढ-उतारानुसार सोने खरेदीचा निर्णय घेण्याकडे ग्राहकांचा कल राहणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button