जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२५ । इस्त्रायल-इराणच्या पार्श्वभूमीवर सोने चांदी दरात मोठी वाढ दिसून आली. मात्र मंगळवारी युद्ध थांबल्याच्या घोषणेने जळगावच्या सराफा बाजारात सोने व चांदी दरात मोठी घसरण झाली. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला.

मंगळवारी जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचा दर प्रति तोळा २००० हजार रुपयांनी घसरला. यामुळे आज बुधवारी सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोने ९७४०० (जीएसटीसह १,००,३२२) रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. तर चांदी १०००हजाराने घसरून प्रति किलो १०६००० (जीएसटीसह १,०९,१८०) रुपयावर पोहोचली. दरम्यान, युद्धानंतरचे धोरण निश्चित झाल्यानंतर आणखी घसरणीचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून विविध देशातील तणाव, युद्ध यामुळे सोने चांदीचे भाव वाढत आहे. त्यात इराण व इस्रायल यांच्यातील युद्ध अधिक तीव्र होत गेल्याने सोने भाव चांगलेच वधारले. १४ जून रोजी तर सोने एक लाख रुपयांवर गेले होते. त्यानंतर थोडेफार कमी होऊन ते ९९ हजार रुपयांच्या पुढेच होते. मात्र, सोमवारी ९९ हजार ४०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात मंगळवारी दोन हजार रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे सोने ९७ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर आले. गेल्या बारा दिवसातील सोन्याचे हे निचांकी भाव आहे.









