---Advertisement---
जळगाव जिल्हा वाणिज्य सोने - चांदीचा भाव

Gold Silver : जळगावच्या सुवर्णनगरीत एकाच दिवशी चांदी ५००० रुपयांनी घसरली, सोनेही झाले स्वस्त..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२५ । सोनं – चांदी खरेदी (Gold Price) करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. जळगावच्या सराफ बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोन्यासह चांदी दरात मोठी घसरण झालीय. शनिवारी सोने दरात ५०० रुपयांची तर चांदी दरात तब्बल ५००० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे ग्राहकांना आणखी स्वस्तात सोने चांदी खरेदीची एक सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

GS 6 April

काय आहे आताचे सोने चांदीचे भाव?
जळगावच्या सराफ बाजारात तिसऱ्या दिवशीही घसरण झाली. यामुळे आज रविवारी सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा दर ८३०४५ रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर ८९,५०० रुपये (जीएसटीसह ९२,१८५) प्रति १० ग्रॅम इतका आहे. दुसरीकडे चांदीचा दर ९०,००० रुपये (विनाजीएसटी) प्रति किलो इतका आहे.

---Advertisement---

चार दिवसात चांदी १२ हजारांनी गडगडली
१ एप्रिलपर्यंत दराचा उच्चांक गाठणारी चांदी औद्योगिक मागणी घटण्याच्या शक्यतेने चार दिवसांत १२ हजारांनी गडगडली. गेल्या महिन्यात मार्चमध्ये १-२ हजारांची अस्थिरता असलेल्या चांदीने १ एप्रिलला १,०२,००० रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यानंतर गुरुवारी ९९ हजार असलेल्या भावात शुक्रवार, ४ एप्रिल रोजी एकाच दिवसात ४ हजारांची घसरण झाली. पाठोपाठ सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी पुन्हा ५ हजारांनी चांदी खाली येऊन ९०,००० रुपये किलो झाली.

सोने तीन दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त?
या आठवड्याच्या सुरुवातीला सोने दराने नवीन विक्रम गाठला होता. बुधवारी सकाळच्या सत्रात सोने विनाजीएसटी ९१७०० रुपयावर पोहोचला होता. हा आतापर्यंत सर्वात उच्चांकी दर होता. मात्र यानंतर सलग तीन दिवस घसरण दिसून आली. या तीन दिवसात सोने २२०० रुपयापर्यंत घसरले आहे.

दरम्यान, अमेरिकेने जाहीर केलेल्या नव्या टेरिफ धोरणानंतर चांदीवरील आयात शुल्क वाढल्याने मागणी घटेल. त्याबरोबर औद्योगिक उत्पादनाचे दरही वाढतील आणि दर वाढल्याने मागणीवर परिणाम होईल. त्याचा एकत्रित परिणाम होत आहे. अपेक्षित असलेली घसरण झालेली आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक जास्त दर कमी होणार नाही, असे जानकरांनी सांगितले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment