---Advertisement---
जळगाव जिल्हा बातम्या वाणिज्य सोने - चांदीचा भाव

दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोने-चांदीचा भाव पुन्हा वाढला; आता प्रति 10 ग्रॅम भाव किती?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२४ । लग्नसराईसाठी सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळं सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांच्या खिशावर चांगलाच ताण पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

GS5 Dec

जळगाव सराफ बाजारात बुधवारी सोन्याच्या किमतीत किंचित प्रति तोळा १०० रुपयाची वाढ दिसून आली. दुसरीकडे चांदीच्या दरात १००० रुपयाची वाढ झाली.

---Advertisement---

किती आहे आज भाव?
जळगाव सराफ बाजारात आज, गुरुवार ५ डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोने ७०,४०३ रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. २४ कॅरेट सोने विनाजीएसटी ७६,८०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. चांदीचा एक किलोचा भाव ९२,००० रुपये इतका आहे.

घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---