जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२५ । सोन्याच्या दरवाढीचे रेकॉर्डवर रेकॉर्ड सुरूच असून एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात ९०० रुपयांची वाढ झाली. यामुळे जळगावच्या सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर ९१,६०० (जीएसटीसह ९४,३४८) रुपये प्रतितोळ्याच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. Gold Silver Rate Today

मागील काही दिवसापासून सोन्याच्या किंमतीत दरवाढीचा ट्रेंड थांबायचं नाव घेत नाही आहे. यामागील कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक टेरिफ धोरणामुळे जागतिक व्यापार युद्धाची चिंता आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून मागणी वाढल्याने सोन्याचे दिवसेंदिवस उच्चांकावर जात आहेत. सोन्याचा भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.
जळगावच्या सराफा बाजारात सलग तीन दिवस तेजी दिसून आली. मागील तीन दिवसात सोने दरात तब्बल १७०० रुपयांची वाढ झाली आहे. ३१ मार्चला सोनायचा दर विनाजीएसटी ८९९०० रुपये इतका होता. तो आज बुधवारी सकाळच्या सत्रात ९१,६०० रुपयांवर पोहोचला आहे. जी सोन्याची आतापर्यंतची सर्वोच्च उच्चांक पातळी आहे. दुसरी सध्या चांदीचे दर १,०२,००० रुपये प्रति तोळ्यावर स्थिरावले आहेत.