माजी मंत्री आ.गिरीष महाजनांनी केले मलीक कुटुंबियांचे सांत्वन

मे 29, 2021 11:19 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२१ । राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते हाजी गफ्फार मलीक यांचे नुकतेच निधन झाले. माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी शनिवारी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.

jalgaon 1

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते हाजी गफ्फार मलीक यांचे नुकतेच निधन झाले. शनिवारी जळगाव शहरात आलेले असताना माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी मलीक कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेत सांत्वन केले.

यावेळी माजी आ.स्मिता वाघ, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, गटनेते भगत बालाणी, उपगटनेते राजेंद्र घुगे, नगरसेवक कैलास सोनवणे, माजी उपमहापौर करीम सालार, नगरसेवक राजू मराठे, मनोज काळे यांच्यासह इतर मान्यवरांनी मलीक कुटुंबाचे सांत्वन केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now