⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

जळगाव ग. स. साेसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गती, मार्चअखेर निवडणूक शक्य

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२२ । गेल्या दाेन वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या ग. स. साेसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रशासकीय कामकाजाला गती आली असून मार्चअखेर निवडणूक शक्य आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने मतदारांची यादी सादर करण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार यादी प्राप्त झाली आहे. दाेन दिवसांत प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

त्यामुळे हरकती मागवून त्यावर निर्णय देण्यासह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती व कार्यक्रम जाहीर करण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मार्चअखेर निवडणूक शक्य आहे.

कार्यक्रमाकडे लागले लक्ष
निवडणुकीचे नियंत्रण करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर हाेईल. निवडणूक कार्यक्रम जाहीर हाेण्यापूर्वीचा ३० दिवसांचा तर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मतदान हाेईपर्यंत ४० दिवसांचा असा एकूण दाेन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

हे देखील वाचा :