⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | बातम्या | हवामान खात्याकडून जळगाव जिल्ह्याला पुन्हा पावसाचा अलर्ट ; वाचा बातमी

हवामान खात्याकडून जळगाव जिल्ह्याला पुन्हा पावसाचा अलर्ट ; वाचा बातमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२४ । मागील आठवड्यात जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. यानंतर गेल्या दोन दिवसांपासून जळगावसह अनेक ठिकाणी पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र अशातच हवामान खात्याने आज पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.

आज या जिल्ह्यांना अलर्ट जारी
हवामान खात्याने आज बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. तर जळगाव, पुणे, कोल्हापूर, सातारा, जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे मराठवड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना देखील आज म्हणजेच बुधवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.

राज्यात आज ७ ते १३ ऑगस्टपर्यंत नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यांत मध्यम, तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांत जोरदार, मुंबईसह कोकणात अतिजोरदार व मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ला निनाच्या प्रभावामुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी होईल.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी खरिपाचे पिके पाण्याखाली गेले आहे. यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. पिकांना खते, तणताशके देता येत नाही. त्यात अधूनमधून पाऊस सुरूच असून जर सूर्यप्रकाश नाही पडला, तर पिकांवर रोगाची प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.