---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

जळगाव जिल्ह्यासाठी पुढील काही तास महत्वाचे; ऐन थंडीत पावसाचा अनुभव..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२४ । गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला होता. मात्र या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली असून यातच अवकाळी पावसाचे सावट ओढवलं आहे. २७ आणि २८ डिसेंबर रोजी जळगाव जिल्ह्यात पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यानुसार आज शुक्रवारी दुपारी जळगाव शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.

Rain

हवामान खात्याने आज २७ व २८ डिसेंबर रोजी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. त्याअनुषंगाने जळगाव जिल्ह्यात आज पावसाची हजेरी लावली.आज दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. दरम्यान, उद्या २८ डिसेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह वादळीवारा आणि गारपीटीसह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

---Advertisement---

दरम्यान जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहून कृतीशिल उपाययोजना कराव्यात. हवामानाबाबत अधिकृत अपडेट्सद्वारे माहिती घ्यावी, आपत्तीत मदतीची गरज भासल्यास जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात टोल फ्री १०७७ किंवा ०२५७-२२१७१९३ किंवा ०२५७-२२२३१८० या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---