जळगाव जिल्हा कारागृहात पुन्हा खळबळ उडवून देणारी घटना, काय आहे वाचा..

ऑगस्ट 31, 2023 2:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२३ । जळगाव जिल्हा कारागृहात पुन्हा खळबळ उडवून देणारी घटना समोर आलीय. खुनाच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून कारागृहात असलेल्या एका बंदीने बॅरेकमध्ये रुमालाच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला. या बंद्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

jalgaon district jail

अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे असं या बंदीचे नाव असून तो खुनाच्या गुन्ह्यात २६ ऑगस्ट २०२१ पासून जिल्हा कारागृहातील कोव्हीड बॅरेकमध्ये बंदी म्हणून आहे.२८ ऑगस्ट २०२३ रोजी कारागृहातील शिपाई विकास महाजन व त्यांचे सहकारी सुरेश बडगुजर, संदीप थोरात, नितीन सपकाळे यांची रात्रपाळी ड्युटी होती. सायंकाळी ६ वाजता ते ड्युटीसाठी कारागृहात हजर झाले.

२९ रोजी रात्री १२.१० वाजेच्या सुमारास सुरेश बडगुजर, नितीन सपकाळे यांच्याकडून ड्युटी चार्ज देवाण-घेवाण करीत असताना अचानक कोव्हीड बॅरेकमधील बंद्यांची आरडाओरड चालू झाली. त्यामुळे या सर्व जणांनी कोव्हीड बॅरेककडे धाव घेतली. यावेळी बॅरेकमधील बंदी अमोल सोनवणे याने पांढऱ्या रंगाच्या बागायतदार रुमालाने बॅरेकमधील कपाटावर चढून आडव्या खांबाला गळफास घेतलेला दिसला.

कारागृहातील पोलिसांनी त्या बॅरेकमधील बंदींना गळफास घेतलेल्याचा पाय पकडून ठेवण्यास सांगितले. एकाने त्याच्या गळ्यातील रुमाल सोडवून त्याला खाली उतरवित त्याचा जीव वाचविला.त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. शिपाई विकास महाजन यांच्या फिर्यादीवरून बंदी अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now