---Advertisement---
जळगाव जिल्हा बातम्या विशेष

जळगाव जिल्ह्याच्या संबंधित ‘हा’ इतिहास तुम्हाला माहितीय का? मग जाणून घ्या..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव (Jalgaon) हा जिल्हा महाराष्ट्रातील एक महत्वाच्या जिल्ह्यांपैकी एक आहे. आज देशात जळगावचे नाव कापूस, केळी व सोने यासाठी प्रसिद्ध आहे. पण पूर्वी जळगाव जिल्ह्याच्या संबंधित इतिहास तुम्हाला माहितीय का? नसेल तर जाणून घ्या..

Jalgaon History

जळगावचा इतिहास (Jalgaon History)
1960 पूर्वी जळगाव जिल्हा, ज्याला पूर्व खानदेश (Khandesh) जिल्हा म्हणूनही ओळखले जाते, पूर्वी “खानदेश” चा एक भाग होता. 1960 मध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीसह जळगाव हा राज्याचा जिल्हा बनला. कापूस, केळी व सोने यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्याला अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. रामायण आणि महाभारतकाळातील घटना आणि घडामोडी जळगाव जिल्ह्याशी संबधित आढळून आलेल्या आहेत. श्री क्षेत्र पद्मालय येथे भीमाने बकासूराचा वध केला होता. तर प्रभु रामाने बाण मारून उनपदेव व सुनपदेव हे गरम पाण्याचे झरे निर्माण केले. अबुल फजल ज्याला अदिलाबाद म्हणतो ते एदलाबाद ( आताचे मुक्ताईनगर) हे चांगले नगर होते. राजा दशरथाने श्रावण बाळाची हत्या करून जे महापातक केले होते. त्याचे परिमार्जन दशरथाने एदलाबादजवळील पवित्र तलावात केले.

---Advertisement---

पारोळा तहसीलमध्ये झांसीच्या महान राणीच्या वडिलांचे मानले जाणारे किल्ल्याचे अवशेष आहेत. 1936 चे अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशन यावल तहसीलच्या फैजपूर येथे आयोजित करण्यात आले होते. सध्याच्या काळात जळगावच्या प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी अहिराणी बोलीची ख्याती सात समुद्रात पसरवली. साने गुरुजींनी कामगार वर्गाला जागवले तर बालकवी ठोंबरे यांच्या कवितेने जिल्ह्यातील सामाजिक-सांस्कृतिक जीवन समृद्ध केले.

३०० परगणे असलेल्या खान्देशची राजधानी होती बऱ्हाणपूर
इतिहासकार बर्निअरने लिहून ठेवल्यानुसार खान्देशात ३०० परगणे अस्तित्वात होते. बºहाणपूर ही खान्देशची राजधानी होती. खान्देशातील सुभ्याचा एकुण महसूल त्यावेळी १८ लाख ५५ हजार रुपये होता. मुघलकालिन हिंदुस्थानच्या नकाशामध्ये जळगाव व भुसावळचा उल्लेख नाही. मात्र अमळनेर, बहाळ, भडगाव, पाचोरा, शेंदुर्णी, लोहारा, एरंडोल, धरणगाव, अडावद, चोपडा, डांभूर्णी, नशिराबाद, यावल, सावदा, न्हावी, चांगदेव, वरणगाव, बोदवड, एदलाबाद, अंतुर्ली, रावेर, बहादरपूर, जामनेर, जामोद, जैनाबाद या गावांचा उल्लेख सापडतो.

दरम्यान, जळगाव केवळ त्याच्या इतिहास आणि सांस्कृतिक वारसाबद्दलच नाही तर त्याच्या केळी उत्पादनासाठी देशभर प्रसिद्ध आहे. जळगाव जिल्ह्यात केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते आणि येथील केळी गुणवत्ता आणि चवसाठी ओळखल्या जातात. सोबतच देशात शुद्ध सोन्यासाठी जळगावची बाजारपेठ प्रसिद्ध आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---