⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

जळगाव जिल्ह्यात ८ मार्चपर्यंत जमावबंदी कलम लागू

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यात ८ मार्चपर्यंत मुंबई पोलिस अधिनियम १०५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) लागू करण्यात आले आहे.

या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलिस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश ज्यांना लाठी किंवा तत्सम वस्तू घेतल्याशिवाय चालता येत नाही अशा वृद्ध अथवा अपंग इसमांना लागू राहणार नाही. प्रेतयात्रा व लग्न समारंभ यांना लागू राहणार नाही, असे अप्पर जिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी कळवले आहे.

हे देखील वाचा :