---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा बँकेचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय ; ३१ मार्चपर्यंत मिळेल लाभ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२५ । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एप्रिल 2024 मध्ये बँकेमार्फत थेट वाटप झालेल्या 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर शून्य टक्के व्याजदराची लागू करण्याची योजना संचालक मंडळाने मंजूर केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी 31 मार्च 2025 पर्यंत फक्त कर्जाची मुद्दल रक्कम परत करावी, व्याज बँक माफ करणार आहे.

JDCC Bank Jalgaon jpg webp

बँकेचे अध्यक्ष संजय मुरलीधर पवार यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी ही संधीचा लाभ घेऊन मुद्दल रक्कम लवकरात लवकर भरावी. तसेच, एप्रिल 2025 पासून घेतलेल्या कर्जाच्या रकमेत 10 टक्के वाढ करून पुन्हा कर्ज उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा आणि बँकेला सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment