⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | एचडीएफसी बँकेत नोकरी तर मिळाली नाही पण गमावून बसला ६४ हजार…

एचडीएफसी बँकेत नोकरी तर मिळाली नाही पण गमावून बसला ६४ हजार…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२१ । ऑनलाईन फसवणुकीच्या इतक्या बातम्या रोज येत असूनही नागरिक अशा आमिषांना बळी पडतच आहेत. अशीच एक नवीन घटना जळगावातील महाबळ परिसरातील तरुणसोबत घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, एचडीएफसी बँकेत नोकरी लावून देतो सांगून उच्चशिक्षित तरुणास भामट्यांनी ६४ हजार रुपयाचा ऑनलाईन चुना लावला आहे.  मंजीत प्रल्हाद जांगीड (वय २५, रा. विद्युत नगरी, महाबळ कॉलनी) हा तरुण शिक्षण घेत आहे. मंजीत याने काही कंपन्यांमध्ये नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज देखील केलेले होते.

२६ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२१ दरम्यान मंजीत याला काही अनोळखी मोबाइल नंबरवरून नोकरीसंदर्भात फोन आले. तसेच ई-मेलच्या आयडीमार्फत एचडीएफसी बँकेचे नाव लोगो असलेले बनावट कागदपत्र, ऑफर लेटर पाठवून मंजीत याला बँकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवले. पैसे मिळाल्यानंतर संबधितांनी मंजरीसोबत संपर्क करणे बंद केले. दरम्यान, पैसे पाठवून देखील नोकरी मिळत नव्हती.

यानंतर तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. रोजच अशा घटना घडत असल्याने नागरिकांनी एकदा स्वतःला काही प्रश्न विचारणे आवश्यक झाले आहे. यात पोलिसांपेक्षा अशा अमिषाला बळी पडणारच दोषी आहेत.

author avatar
Tushar Bhambare