⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

वॉटरग्रेसच्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करा, सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी

जळगाव लाईव्ह न्युज । २० ऑक्टोबर २०२२ । जळगाव शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. इतकं असूनही मनपा प्रशासन संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई करत नाहीये. जळगाव शहर मनपा प्रशासन ठेकेदारावर कोणतेही कारवाई करत नसून या ठेकेदाराला पाठीशी घालत आहे. असा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी मनपा येथे आयोजित प्रभाग समिति आढावा बैठकीत केला.

महानगरपालिकेच्या पहिल्या माळ्यावरील सभागृहामध्ये आमदार राजूमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समिती आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकी वेळी मनपा आयुक्त विद्या गायकवाड, मनपा महापौर जयश्री महाजन, उपायुक्त अभिजीत बाविस्कर , अतिरिक्त आयुक्त प्रशांत पाटील, एम जी गिरगावकर आदी अधिकारी उपस्थीत होते.

यावेळी सर्व नगरसेवकांनी वॉटर ग्रेस कंपनीचा ठेका ताबडतोब रद्द करावा त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं अशी मागणी केली. यावेळी जळगाव शहरात अस्वच्छता पसरली आहे. मात्र ठेकेदार कोणालाही जुमानत नाही. ठेकेदाराला महानगरपालिका प्रशासन पाठीशी घालत आहे असा आरोप यावेळी सर्वांनी केला.

नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी वॉटर गॅस कंपनीच्या 35 घंटा गाड्या बंद आहेत तरीदेखील कोणतेही कारवाई यांवर केली जात नाही. असा आरोप केला तर नगरसेवक सचिन पाटील यांनी देखील प्रशासन या कंपनीच्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट न करता त्याला पाठीशी घालत आहेत असा आरोप केला.

तर माजी उप महापौर अश्विन सोनवणे यांनी ठेकेदार कोणतही काम करत नसून त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने ठेकेदाराला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप यावेळी केला.