⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात ‘या’ पदांसाठी भरती ; ३० हजार रुपयापर्यंत मिळेल पगार

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात ‘या’ पदांसाठी भरती ; ३० हजार रुपयापर्यंत मिळेल पगार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे विधी अधिकारी पदांची ०१ जागेसाठी भरती प्रकिया राबविण्यात येत आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. लक्ष्यात असू द्या  अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ आहे.

या पदांसाठी होणार भरती

१) विधी अधिकारी/ Law Officer

शैक्षणिक पात्रता व अनुभव 

या भरतीसाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधारक (एल.एल.बी) असावा व तो सनदधारक असावा. तसेच ७ वर्षाचा अनुभव

परीक्षा शुल्क :

या भरतीसाठी कुठलीही परीक्षा शुल्क आकारले गेले नाहीय.

मानधन : एकत्रित मानधन दरमहा रक्कम रु. 30,000/- आणि दुरध्वनी व प्रवास खर्च रु.5000/- ठोक स्वरुपात.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अटी, शर्ती

1. सदर पदाची नेमणूक ही पूर्णत: कंत्राटी पध्दतीने असेल. सदरहू विधी अधिकारी शासकीय कर्मचारी म्हणून गणले जाणार नाहीत.

2. सदर नेमणुका करार पध्दतीने प्रथमतः 11 महिन्यांसाठी करण्यात येतील. 11 महिन्यानंतर आवश्यक असल्यास काररनाम्याची मुदत वेळोवेळी वाढविता येईल. तथापि, अशी मुदत वाढवितांना एकावेळी ही मुदत 11 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी असणार नाही. अशाप्रकारे जास्तीत जास्त 3 वेळा नियुक्ती करता येईल. त्यानंतर पुनश्च नियुक्ती करावयाची असल्यास पुनश्च निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागेल.

3. नियुक्तीचे वेळी विहित प्रपत्र-ब मध्ये करार करावा लागेल.

4. करार पध्दतीने नेमणूक करण्यात आल्यानंतर एकत्रित मानधन आणि अनुज्ञेय दूरध्वनी व प्रवास खर्चाव्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाहीत.

5. विधी अधिकारी पदाबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल रिट याचिका क्र. 5879/2021 दाखल आहे. सदरील याचिकेतील अंतिम निर्णय संबंधीत उमेदवार यांचेवर बंधनकारक राहील.

अर्जासोबत उमेदवाराने खालील कागदपत्रांच्या साक्षांकीत प्रती जोडणे बंधनकारक असून तसे न केल्यास अर्ज अपात्र ठरेल.

1. विहित नमुन्यातील अर्ज.

2. पदवी प्रमाणपत्र

3. कायद्याच्या पदवीबाबतचे प्रमाणपत्र

4. इतर अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे.

5. सनद

6. शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला,

7. वकीली व्यवसायाचे किमान 7 वर्षे अनुभवाचे प्रमाणपत्र,

४. शासकीय कामाचा अनुभव असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र,

9. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे ज्ञान असलेयावतची प्रमाणपत्रे,

अर्ज कसा करावा? 

पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा अधिकारी कार्यालय, जळगाव.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा

 

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.