आजपासून जळगावात पुन्हा थंडी वाढणार; २४ जानेवारीपर्यंत असं राहणार तापमान?
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२५ । जळगावसह (Jalgaon) राज्यातील हवामानात (weather) सातत्याने बदल पाहायला मिळत असून आता काही दिवसापासून कमी झालेला थंडीचा (Cold Weather) कडाका वाढणार आहे. जळगाव जिल्ह्यात आज १९ ते २४ जानेवारी दरम्यान पहाटे थंडीचा जोर राहण्याची शक्यता आहे. Jalgaon Cold Weather Today
जळगावात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात वाढ होऊन थंडीचा कडाका कमी झाला होता. मागील दोन दिवसापासून थंड वाऱ्यामुळे पहाटे आणि रात्री थंडी काहीशी वाढली होती. मात्र दुपारीचा उन्हाचा चटका कायम होता. दरम्यान आजपासून थंडी पुन्हा वाढणार आहे.
१९ ते २४ जानेवारी दरम्यान पहाटे थंडीचा जोर वाढून किमान तापमान १२ ते १४ डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. २३ जानेवारीपर्यंत कमाल तापमान ३२ ते ३३ डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील, त्यामुळे दुपारच्या वेळेस काहीसा उकाडा जाणवेल, अशी माहिती हवामान अभ्यासक यांनी दिली.
अरबी समुद्रामध्ये केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. उत्तर भारतात वेगाने वारे वाहत आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फवृष्टीमुळे तापमानात घट होत आहे. याचा परिणाम म्हणून किमान तापमानात घट होऊन थंडीत वाढ होत आहे.