⁠ 
सोमवार, ऑक्टोबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगावकरांनो पाणी साठवून ठेवा ; पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला, कोणत्या भागात कधी होणार?

जळगावकरांनो पाणी साठवून ठेवा ; पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला, कोणत्या भागात कधी होणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२३ । जळगाव शहरवासियांसाठी पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची बातमी आहे. शहरात आठ दिवसांपूर्वी दोन दिवस पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. त्यात आता शुक्रवारी रात्री जोरदार पावसामुळे वाघुर पम्पिंग स्टेशन तसेच उमाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील विद्युत पुरवठा रात्री खंडित झाला. त्यामुळे शनिवारी होणार पाणीपुरवठा होणार होता तो होऊ शकला नाही. त्यामुळे त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेला पाऊस, त्यात शुक्रवारी रात्री जोरदार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या वाघुर धरणावरील पम्पिंग स्टेशनचा तसेच उमाळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युत पुरवठा हा रात्री साडेनऊपासून खंडित झाला होता. शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे शहरात ९ रोजी होणारा पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकला असून, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन मनपाने केले आहे.

आज रविवार १० रोजी होणारा पाणीपुरवठा …
वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकरनगर, आसोदा रोड परिसर, नित्यानंद नगर टाकी परिसर, मोहननगर, नेहरूनगर परिसर, खंडेरावनगर परिसर, हरिविठ्ठलनगर, पिंप्राळा गावठाण परिसर, गायत्रीनगर, नूतन वर्षा कॉलनी, शारदा कॉलनी, मानराज टाकीवरील- दांडेकरनगर, मानराज पार्क, असावानगर, निसर्ग कॉलनी, खोटे नगर टाकी वरील भाग- द्रोपदीनगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलिस कॉलनी परिसर, खोटे नगर गेंदालाल मिल टाकी वरील- शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, एस.एम.आय.टी. परिसर, योगेश्वरनगर, हिरा पाईप व शंकरराव नगर व खेडगाव परिसर, डी.एस.पी. टाकी- तांबापुरा, गणपतीनगर, आदर्शनगर व इतर परिसर, शिवकॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंदनगर व इतर भाग, अयोध्यानगर पहिला दिवस- गृहकुल, म्हाडा कॉलनी, रायसोनी शाळा परिसर, अजिंठा हाउसिंग सोसायटी, जगवानीनगर, मेहरुण पहिला दिवस- सदाशिवनगर, रामनगर, रजा कॉलनी, अक्सानगर, गणेशपुरी.

सोमवार, ११ रोजी होणारा पाणीपुरवठा..
खंडेरावनगर टाकी दुसरा दिवस- पिंप्राळा गावठाण उर्वरित भाग, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बैंक कॉलनी, आशाबाबानगर, पिंप्राळा टाकी, मानराज टाकी दुसरा दिवस- शिंदेनगर, अष्टभुजा, निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, निमखेडीचा भाग, नित्यानंदनगर टाकी दुसरा दिवस- नित्यानंदनगर, संभाजीनगर, समतानगर परिसरातील उर्वरित भाग, डी.एस.पी. बायपास तांबापुरा, डी.एस.पी. टाकीवरुन जिल्हा रोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी परिसर, नूतन वर्षा कॉलनी, चैत्रवन कॉलनी इ., गिरणा टाकी परिसरातील उंच टाकी, भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हेनगर,

मंगळवार, १२ रोजी होणारा पाणीपुरवठा..
नटराज टाकी ते चौघुले मळा पर्यंतचा भाग, शनीपेठ, बळीरामपेठ, नवीपेठ, हाउसिंग सोसायटी, शाहूनगर, प्रतापनगर, गेंदालाल मिल टाकी वरील भाग- खडके चाळ, इंद्रप्रस्थनगर, के.सी. पार्क, गेंदालाल मिल हुडको, रिंगरोड संपूर्ण-भोईटनगर,भिकमचंद जैननगर, आकाशवाणी टाकी वरील संपूर्ण भाग, जुनेगाव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज,ओंकारनगर, गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी व इतर परिसर, डायरेक्ट सुप्रीम कॉलनी परिसर, डी.एस.पी. टाकी- साने गुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.