गुन्हेजळगाव शहर

जळगाव शहर पुन्हा हादरले ! दगडाने ठेचून प्रौढाचा खून

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । जळगाव शहर पुन्हा खुनाच्या घटनेने पुन्हा हादरले आहे. शहरातील मेहरूण तलावाच्या काठावर दगडाने ठेचून एका ४५ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. दिनेश भिकन पाटील (वय-४५, रा.रामेश्वर कॉलनी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहचले आहे.

जळगाव शहरात खुनाची मालिका सुरूच आहे. गेल्या पंधरा दिवसात दोन खून झाले होते. त्यानंतर आज पुन्हा एका प्रौढाचा दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. मयत दिनेश पाटील हा सुप्रीम कंपनीत कामाला होता. आज दुपारी त्यांचा मेहरूण तलावजवळील डॉ.राजेश जैन यांच्या फार्म हाऊस शेजारी मृतदेह आढळून आला

दगडाने ठेचून त्यांचा खून करण्यात आल्याचा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोवर या प्रकरणी पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक अरुण धनावडे, कर्मचारी व एलसीबीचे पथक पोहचले आहे.

पोलिसांनी घटनास्थळी आढळून आलेले रक्ताने माखलेले दगड, दारू आणि पाण्याची बाटली, मयताची दुचाकी, चप्पल असे साहित्य हस्तगत केले आहे.

पहा थेट प्रक्षेपण :

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/4834115820044484

Related Articles

Back to top button