⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

भाजप पक्षश्रेष्ठींनी टेकले ‘हात’, फुटीर नगरसेवकांची ‘नकारघंटा!’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । चेतन वाणी । शहर मनपाच्या महापौर, उपमहापौर निवडीवरून फुटलेल्या भाजप नगरसेवकांची पुन्हा मनधरणी करण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहे. पक्षश्रेष्ठींचे कॉल फुटीर नगरसेवक घेत नसून इतरांच्या माध्यमातून दिलेल्या निरोपाला देखील प्रतिसाद देत नसल्याने अखेर भाजपच्या तलवारी म्यान होण्यात जमा आहे. भाजपचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्याने शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौरपदी निश्चित झाल्या आहेत.

भाजपातील अंतर्गत गटबाजी आणि काही नगरसेवकांच्या मनातील नाराजीने मोठा घोळ केला असून ऐन महापौर, उपमहापौर निवडीप्रसंगी स्वतःच्याच पक्षाला जय श्रीराम करीत नगरसेवकांनी हातावर शिवबंधन बांधण्याची तयारी केली आहे. भाजपातून बाहेर पडण्याच्या तयारीने नॉट रिचेबल असलेले काही नगरसेवक जळगावात देखील दाखल झाले आहे. फुटीर नगरसेवकांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी सर्व प्रयत्न करून पाहिले आहेत. पक्षाचे जेष्ठ नेते, पदाधिकारी, मित्र परिवार यांनी फुटीर नगरसेवकांशी स्वतः संपर्क साधला मात्र ते कुणाचेही फोन कॉल घेत नाही, काहींनी रात्रीपर्यंत बोलणे केले मात्र सकाळपासून मोबाईलच बंद केले. भाजप पक्षश्रेष्ठींनी इतरांच्या माध्यमातून देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु ते देखील फोल ठरले आहेत. भाजपची तलवार अखेर म्यान झाली असल्याने शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौरपदी विराजमान होणार हे मात्र निश्चित झाले आहे.

भाजप नेत्यांचे जळगावात दिवसभर विविध ठिकाणी आणि विश्रामगृहात फुटीरांच्या घरवापसीवर विचारमंथन सुरू होते.

हे देखील वाचा :

होय… भाजपचे ३० नगरसेवक फुटले… कुलभूषण पाटलांसह ३३ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

सत्तांतराची इनसायडर स्टोरी… ज्येष्ठ नेत्यांचे असेही टॉर्चरिंग…

भाजपच्या सत्ता उतार होण्याचा काळा वर्तमान