१८ वर्षीय मुलीचा टोकाचा निर्णय ; कुटुंबियांना बसला मोठा धक्का.. यावल तालुक्यातील घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२३ । सध्या मुलं-मुली नैराश्यातून आत्महत्या करत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. अशातच आता एका १८ वर्षीय मुलीने सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

प्रणाली रामकृष्ण मेढे (वय १८) असं मृत मुलीचे नाव असून ही घटना यावल तालुक्यातील नावरे येथे उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मुलीच्या आत्महत्येचं कारण अद्यापही कळू शकले नाही. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

प्रणाली मेढे ही नावरे येथे कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहे. दरम्यान तिने शुक्रवारी दुपारी आपल्या राहत्या घरातील समोरच्या खोलीत छता असलेल्या झोक्यासाठी लावलेल्या लोखंडी कडीला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून तिचा मृतदेह पाहून कुटुंबियांनी हंबरडा फोडला.

या घटनेची खबर मरण पावलेल्या तरूणीचे वडील रामकृष्ण सुपडू मेढे यांनी दिल्याने यावल पोलीस ठाण्यात आक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन, मयत हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी केले. तरूणीने आत्महत्या सारखे पाऊल का उचलंले हे मात्र अद्यापही कळू शकले नाही घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहेत.